चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-पोलीस खात्यात उल्लेखनिय सेवा, उत्तम कार्य,विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणा-या पो.महासंचालक पदांची यादी दि.२८ रोजी जाहीर झाली.राज्याच्या पो. महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली.यात राज्यातुन एकूण 800 पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना या पदकाने सन्मानित केले. यामध्ये लातुर जिल्ह्यातीलअहमदपुर विभागाचे कर्तबगार डि.वाय.एस.पी. मनीषजी कल्याणकर यांचा समावेश आहे.त्यांना 1 मे महाराष्ट्र दिनी पदक सन्मानचिन्हाने पालकमंञ्याच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस खात्यात विविध प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल अहमदपुरचे कर्तबगार पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषजी कल्याणकर यांची निवड झाली आहे.
याबद्दल जिल्हा पोलीस प्रमूख S.P. सोमयजी मुंडे,स्था.गु.शा.चे संजीवन मिरकले,ए.एस.पी.डाॅ.अजय देवरे, परिविक्षाधिन पोलीस अधिक्षक बी. सी.रेड्डी,स्था.गु.शा.चे राजेश घाडगे, स्पे.पथकाचे राष्ट्रपाल लोखंडे या व अन्य पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचेकडून व पञकार पप्पु पाटील तसेच मिञपरिवार यांचेकडून अभिनंदन, कौतूक व शुभेच्छां - चा वर्षाव मनीष कल्याणकर यांच्यावर होत आहे.
0 टिप्पण्या