चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:-तालुका पातळीवर समीत्या अधिक सक्षम करणार जिल्हयातील बोगस डॅाक्टरांचा शोध घेवून त्यांचे त्यांचे विरुध्द कार्यवाही करणे करिता जिल्हास्तरीय बोगस डॅाक्टर पुर्नविलोकन समिती स्थापन करण्यात आली असुन शासन निर्णयात दिलेल्या व्याख्ये नुसार शासनमान्य वैद्यकशास्त्रातील पदवी/पदविका असलेले अर्हताधारक व महाराष्ट्र राज्यातील संबंधित वैद्यक परिषदेचे नोंदणीकरण नसलेल्या वैद्यकिय व्यावसायिकांस बोगस अनधिकृत डॉक्टर समजण्यात यावे. अशा प्रकारचे बोगस डॉक्टर आढळुण आल्यास सबळ पुरव्यानिशी नागरीकांनी बोगस डॉक्टरांची तक्रार करण्यासाठी राज्यस्तरीय तक्रार व निवारण कक्षाला (१०४ क्रमांकावर) किंवा जिल्हाधिकारी कार्यालय चॅटबॉट क्रं 8669494944 (संवादसेतू) वर संपर्क करावा असे आवाहन मा.डॉ.विपीन,जिल्हाधिकारी नागपूर यांनी केले. सदरील बैठकीस बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समिती सदस्य हजर होते
0 टिप्पण्या