Ticker

6/recent/ticker-posts

"लवकर जेवन करा,ढाबा बंद करु द्या" असे म्हणणा-यावर हल्ला..!

वाढवणा पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-प्रशासनाने ठरवुन दिलेल्या नियमा च्या आत ढाबा बंद करायचा आहे, तेंव्हा जेवन लवकर करा.असे ढाबा चालक म्हणताच त्याच्यावर दोघांनी हल्ला करुन डोळ्यात मिरची पावडर टाकुन जबर मारहान केली.ही घटना उदगीर तालुक्यातील वाढवणा पो. ठाण्याच्या हद्दीतील मौजे.चांदेगाव पाटी येथे घडली आहे.याबाबत दोघां विरुध्द वाढवणा बू.पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुञाकडून मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी बजरंग हरिबा वाघमारे (वय ३२,नागलगाव ता.उदगीर) यांनी पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले ते असे की, चांदेगाव पाटी येथे असलेल्या ढाब्या मध्ये आरोपी चंद्रकांत आणि एक हे जेवण करण्यास आले असता राञी खुप वेळ झालाय.जेवण लवकर करा,ढाबा बंद करायचा आहे.असे म्हणताच फिर्यादीस दोघांनी डोळ्या मध्ये मिरचू टाकुन शिवीगाळ करत, काठीने खांद्यावर,मांदीवर जबरदस्त मारहाण केली.यामध्ये जबर दुखापत झाली.म्हणुन याबाबत तक्रार दिली म्हणुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.याचा तपास पोहेकाॅ.एस. सोनवणे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या