चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-आयजी नांदेड,एलसीबी व एस.पी. लातुर यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी व त्यांच्यावर धाड टाकण्यासाठी स्पे. पथकांची नेमणूक केली आहे.आणि याच स्पे.पथकाने वाढवणा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या गुडसूर व घोणशी येथील 2 ढाब्यावर धाड टाकून 4 हजाराच्या अवैध दारुसह 2 इसमाला ताब्यात घेतले आहे.
वरीष्ठांनी नेमलेले पथक नांदेड व लातुरहून येऊन धाडीवरधाडी टाकत असल्याचे बघून स्थानिक वाढवणा पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क खाते झोपेत गाढ व अनभिज्ञ तर नव्हते, ना?
याबाबत पोलिसाकडून समजलेली थोडक्यात माहिती अशी की,आयजी नांदेड व एलसीबी लातूर यांच्या स्पे. पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन स्पे.पथक हे गुडसुरच्या हाॅटेल भाऊचा ढाबा व घोणशीच्या हाॅटेल साईचा ढाबा येथे आले असता,वरील 2 ही ढाब्यामध्ये विनापरमीट,अवैध दारु विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच पथका मधील डॅशिंग पोलीसांनी रेड केली असता हाटेल साई ढाबा येथे २६०० रु.ची तर हाॅटेलचा भाऊ ढाबा येथे १४१० रु.ची सीलबंद देशी - विदेशी दारु हस्तगत केली आहे.
या प्रकरणात आरोपी हंसराज राम भिसाडे व आरोपी दिलीप माधव सोमासे यांच्याविरुध्द सचीन गोविंद कांबळे (पो.शि.लातूर पथक) यांनी फिर्याद दिलेवरुन पो.स्टे.वाढवणा बू. येथे गुरनं.१०४/१०५/२०२५ मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.व याचा पुढील तपास हे. काॅ.संजय कलकत्ते व शिवप्रताप रंगवाळ हे करत आहेत.
*नांदेड व लातुर येथील वरीष्ठांनी नेमलेले स्पे.पथक येथे व परिसरात रेड करत असताना स्थानिक अधिकारी काय करतात?वाढवणा बू व हाळी येथील शासमान्य किरकोळ विक्री देशी दारु दुकाणातून रोज 30/40 पेट्या देशीदारुची विक्री व वाहतूक ही अजनसोंडा,मोरतळवाडी गाव, सुकणी,वडगाव हटकरवाडी तंडा येथे होते. किरकोळ विक्रीचा परवाना असतानाही ठोक मध्ये पेट्याच्या पेट्या दारुची विक्री करणा-या परवानाधारक दुकाणदार व उत्पादन शुल्क विभाग यांच्यात आॅनलाईन पे होत असल्याची चर्चा वाढवणा व हाळी येथे ऐकू येत आहे...!
0 टिप्पण्या