चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा: जागतिक वसुंधरा दिना चे औचित्य साधून स्थानिक मिस्कीन गार्डन येथील छत्रपती संभाजी राजे योग उद्यान येथील रमणीय वातावरणात संस्कार भारती भंडारा चे भू _अलंकरण विधा द्वारे भव्य,आकर्षक,संदेश देणारी रांगोळी साकारण्यात आली. भू_अलंकरण चे सौ चंदा मुरकुटे,निता मलेवार,अनघा चेपे, करुणा शेंडे,जया कडीयम,प्रकाश मुरकुटे,मोहन भाकरे ई कलावंतांनी यात सक्रिय सहभाग घेतला.या प्रसंगी संस्कार भारती चे दत्ताजी दाढी,रामदासजी शहारे,ग्रीन हेरिटेज चे संस्थापक मो सईद शेख, प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे,अतुल वर्मा, उद्धव डोरले,हरीश मदान,हरिभाऊ थोटे,जागेश्वर साठवणे व इतर योगप्रेमी उपस्थित होते. शेख यांनी समय_असमय घडणाऱ्या प्राकृतिक घटना, वर्षा,ग्लोबल वॉर्मिग, वनांचे घटते प्रमाण,पर्यावरणा ची होत असलेली मोठी हानी, ई मुळे मानवी जीवनावर परिणाम होवून मानव,भावी _पिढी साठी सर्वांनी मिळून वसुंधरेचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.रांगोळी साकारण्यात भू_अलंकरण विधेचे सर्व कार्यकर्ते,संस्कार भारती चे पदाधिकाऱ्यांचे या करिता सहकार्य लाभले.
अत्यंत वर्डळीचे ठिकाण असल्यामुळे येणाऱ्या_जाणाऱ्याकरिता ही रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे।
0 टिप्पण्या