तहसीलदारांना निवेदन;वीटभट्टीमालकांकडून ग्राहकांची लूटमार
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : वीट भट्टी मालक मनमानी पद्धतीने वीटांचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. अशा वीटभट्टीमालकांवर कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, टूकी गावाचे दिलीप मुसळदे,लोहाराचे सुरेश पवार, रामदास मुसळदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यात घरकुल योजनेंतर्गत व स्वतःच्या खाजगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करीत आहेत. घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे.वीटांची वाढती मागणी बघून लक्कडकोट, रामपूर सह शहादा तालुक्यातील सर्वच वीटभट्टीधारक,वीटमालक हे त्यांच्या मनमामी पद्धतीने वीटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांस घरबांधकाम करण्यास परवडत नाही. या एप्रिल २०२५ च्या चालू महिन्यात वीटांचे दर ३००० वीटां साठी १२५०० रूपये होता.त्यानंतर लगेचच १४००० रूपये करण्यात आला व नंतर पुन्हा १६००० रूपये करण्यात आला.आजचा दर १८००० रूपये घेतले जात आहेत.अचानक पणे वीट मालकांनी वीटांचे दर वाढवून ग्राहकांस लुबाडणूक सुरू केलेली आहे.वीटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवाणा-या वीटभट्टीधारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी.जेणेकरून वीटभट्टीधारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या