चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-अकलूज निमा शाखेचे गेली अनेक वर्ष अकलूज येथील कदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा व माजी एम.सी.आय.एम.सदस्य डॉ.तानाजीराव कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सौ.अंजली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.निमा संघटनेसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
डॉ.सौ.अंजली कदम या निमा वुमेन्स फोरम अकलूज शाखेच्या फाऊंडर अध्यक्षा आहेत.त्यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज शाखेच्या वतीने डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणे,तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टरांचे ब्लड कॅम्प, वृक्षारोपण,विविध शिक्षण संस्थेतील विद्यार्थिना शिबिराच्या माध्यमातून PCOD, Good touch.Bad touch, पाळीच्या, आरोग्याच्या समस्या यावर प्रबोधन,योगा कार्यशाळेचे आयोजन,संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देणे,कामगार महिलांची मोफत तपासणी, बचतगट महिलांना मार्गदर्शन, असे अनेक समाजोपयोगी उपक्रम कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीत पार पडले आहेत. यामुळे अकलूज शाखेला मोस्ट ऍक्टिव्ह ब्रँचचा किताब मिळाला आहे.त्यांच्या या कार्याची नोंद महाराष्ट्र स्टेट ब्रँचने घेतली व त्यांची महाराष्ट्र स्टेट निमा वुमेन्स फोरमच्या डिव्हिजनल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे.डॉ अंजली कदम यांच्या निवडीने निमा वूमेन्स फोरममध्ये नवीन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याची सेक्रेटरीपदी निवड झाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
निमा संघटना अकलूज ब्रँच अध्यक्ष डॉ.अमोल माने उपाध्यक्ष हर्षवर्धन गायकवाड, सचिव दादासाहेब पराडे, कोषाध्यक्ष दिलीप पवार,प्रवक्ते डॉ.सुधीर पोफळे,माजी अध्यक्ष डॉ शिरीष रणवरे,डॉ.उत्तम खरात डॉ.उदयसिंह माने देशमूख,डॉ.शशिकांत मगर,डॉ सुनील चव्हाण,डॉ प्रशांत निंबाळकर,डॉ.अस्लम शेख,डॉ. फारुख शेख व पदाधिकारी यांनी कदम मॅडम यांना मानाचा फेटा शाल आणि चाफ्याचे झाड देऊन सन्मान केला.तसेच निमा वूमेन्स फोरम अकलूज ब्रँचच्या अध्यक्षा डॉ.विद्या एकतपुरे,उपाध्यक्ष डॉ. उर्मिला पाटील,सचिव डॉ.कविता पाटील,कोषाध्यक्ष डॉ,रुपाली पराडे,सल्लागार निशांत मुल्ला सदस्य शिल्पा फडे आणि कार्यकारी मंडळ यांनी बुके,शाल देऊन सन्मान केला तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर ॲड.मगर, ॲड.कदम फॅमिली, माळशिरस तालुका बचत गट प्रमुख, व्यवस्थापक कामिनी ताटे देशमुख,सर्व पॅथीचे डॉक्टर्स, यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या