Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाप्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकला आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्य़ातील पोलीस प्रशासनाकडून आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नंदूरबार संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील विविध आदिवासी संघटनांनी दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ठीक १२ वाजता आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा काढला.मोर्चाची सुरुवात नवापूर चौफूली नंदुरबार येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.नवापूर चौफूली ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, जिल्हा परिषद नंदूरबार पर्यंत मोर्चा काढण्यात आला.भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनींची चौकशी करून कारवाई करा,जिल्ह्य़ातील प्रलंबित वनदावे निकाली काढा,जातीयवादी निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा याच्यावर कायदेशीर कारवाई करून जिल्हाबाहेर तात्काळ बदली करा,जिल्ह्य़ातील अवैद्य धंदे बंद करा,पिंपर्ळे येथील ॲस्ट्रासिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करा,सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले करणा-या धडगांव तालुक्यातील मोडलगांव येथील सरपंच व गुंडांना अटक करा,धडगांव व शहादा तालुक्यातील भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणा-या धडगांव येथील गटविकास अधिकारी व शहादा येथील गटविकास अधिकारी यांना निलंबित करा,दोन पदांवर काम करणा-यांचे पगार संबंधित  विभाग प्रमुख व सहा.आयुक्त मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना नंदूरबार यांच्याकडून वसूल करा,बोगस सरपंचांवर कारवाई करा,धडगांव तालुक्यातील केलापाणी,बिलगांव हेंद्र्यापाडा, शेलदा या गांवात पाणी,रस्ता,वीज,शाळा,अंगणवाडी, शाळा, दवाखाना सोय करा,अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार मित्ताली सेठी मॅडम यांना  देण्यात आले.१ तास चर्चा करण्यात आली.जिल्हाधिकारी यांनी मागण्यांबाबत कार्यवाही सुरू केली.पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त हे रजेवर असल्याकारणास्तव उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिनांक ५ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक हजर झाल्यावर मागण्यांबाबत कार्यवाही करणार.असे  पोलीस प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले.अर्धा तास चर्चा करण्यात आली.जिल्हा परिषद नंदूरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार उपस्थित नसल्याकारणास्तव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.एक तास पेक्षा अधिक वेळ चर्चा करण्यात आली.येत्या पंधरा दिवसांच्या आत मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे लेखी स्वरूपात अधिकारी यांनी लिहून दिले.
                या जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्रदेशाध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,ॲडवोकेट राहुल कुवर,जितेंद्र बागुल संस्थापक अध्यक्ष, विश्व आदिवासी सेवा संघटना, बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी ,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,वासुदेव गांगुर्डे आदिवासी हक्क व संरक्षण समिती,गणेश सोनवणे एकलव्य भिल्ल आदिवासी सेना,सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिल गावीत ,योगेश गावीत,कुवरसिंग पराडके, सुनिल वळवी, संदीप कोकणी इत्यादी विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सह महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
                  वनदावे मंजूर करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची,भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई झालीच पाहिजे,चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,जातीवादी निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांची नंदूरबार जिल्ह्य़ातून हकालपट्टी झालीच पाहिजे,पुलीस की गुंडागर्दी नही चलेगी,जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करा,सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करणा-यांना अटक झालीच पाहिजे,अस्ट्रासिटीतील आरोपींना अटक करा,भ्रष्टाचारी सरपंच  व ग्रामसेवकावर कारवाई झालीच पाहिजे,बंद करो बंद करो,भ्रष्टाचार बंद करो,पाणी द्या आदिवासींना पाणी द्या,रस्ता द्या आदिवासींना रस्ता द्या,शाळा द्या आदिवासींना शाळा द्या अशा जोरदार घोषणा मोर्चेक-यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या