Ticker

6/recent/ticker-posts

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी  
भंडारा :-नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून या कार्यक्रमाला एक उत्साही आणि प्रेरणादायी रूप दिले.
            कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ प्रा. के.जी.लोथे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले. 
            याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, गीत सादर केलेत. अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा प्रभावीपणे उल्लेख केला. त्यांच्या भाषणातून डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टी आणि समाजासाठी केलेल्या त्यागाची जाणीव झाली. 
            कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापिका स्वाती गहाणे हे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आहेत. यांनी डॉ. आंबेडकरांच्या "शिक्षण,संघटन आणि संघर्ष" या त्रिसूत्री चे महत्व विशद केले.त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, सामाजिक न्यायासाठी संघटित होण्याची आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. 
            विद्यालयातील शिक्षकांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की डॉ.आंबेडकर केवळ एका विशिष्ट समाजाचे नव्हे, तर संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.
            कार्यक्रमाचे शेवटी विद्यालयामध्ये अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली.यात प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभाग घेतला
            एकंदरीत विद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आणि कार्याची माहिती मिळाली, तसेच सामाजिक बांधिलकीची भावना जागृत झाली. 
            कार्यक्रमाचे संचालन आर.व्ही.दिघोरे सर यांनी आभार प्रदर्शन धनंजय तुमसरे सर यांनी केले. 
           कार्यक्रमाचे यशस्वीते करिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुंदर नियोजन करून सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या