Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर आयोजित भीमजयंती उत्साहात साजरी !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहर आणि शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सेवा आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  

या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी अभिवादन सभेला मार्गदर्शन करून उपस्थितांना उद्देशून प्रेरणादायी भाषण केले.  

कार्यक्रमात पुढील उपक्रम राबविण्यात आले:  

1) 5000 लोकांसाठी अन्नदान 
2) 5000 मोतीचूर लाडूंचे वाटप  
3) 5000 पाण्याच्या बाटल्या वितरीत  
4) आजपासून मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू  
5) बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी 5043 लोकांच्या स्वाक्षऱ्या  

शहर उपाध्यक्ष प्रमोद वनशिव यांनी अन्नछत्र आणि पाण्याच्या बाटल्यांसाठी धम्मदान दिले. कार्यक्रमावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग यांचीही विशेष उपस्थिती लाभली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या