चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-आगामी कांही महिण्यात होणा-या हाळी-हंडरगुळी या गावच्या ग्रा.पं.चे सरपंचपदाचे आरक्षण ओपन स्ञी या वर्गासाठी सुटले आहे.यामुळे कहीं खुशी,कहीं गम..! अशी स्थिती पुरुष मंडळींची झाली आहे..
दि.२४ रोजी तालुक्यातील कांही ग्रा. पं.सरपंचपदाचे आरक्षणाची सोडत काढण्यात आली.यामध्ये तालुक्यात म्हत्वाच्या गावापैकी असलेल्या अन् इं.काॅं.व रा.काॅं.{अ.प} या २ पक्षाचे तालुक्याचे प्रमूख पद असलेल्या व लातुर व उदगीर येथील आमदारांचे विश्वासू असलेल्या पुढा-यांचे गाव असलेल्या हाळी व हंडरगुळी या २ गावच्या सरपंचपदाच्या आरक्षणकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले होते.व दि.२४ रोजी तहसील कार्यालयात झालेल्या सोडतीत येथील सरपंचपद हे खुल्यावर्गातील महिलेसाठी सुटले आहे.यामुळे इच्छूक महिला मंडळीत व त्यांच्या नातेवाईकात "खुशी" तर सरपंचपदासाठी इच्छूक असलेल्या पुरुष मंडळीत "गम" पसरला आहे.
जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने आगामी निवडणुकीकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
येणा-या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, गत पंचवार्षिक मध्ये या २ ही गावचे सरपंच हे पद ओबीसी पुरुषासाठी होते.तर आगामी काळात या २ ही गावचे सरपंचपद हे ओपन महिलेसाठी सुटले आहे.हे विशेष!
१५ सदस्य असलेल्या हाळीहंडरगुळी या २ ही ग्रा.पं.चे सध्याचे सरपंच हे ओबीसी पुरुष आहेत.माञ हाळीत सत्ताधारी गटाचा ओबीसी पुरुष सदस्य नसल्याने महिलेला पदावर बसविले.आणि आता येणा-या निवडणुकीतही या २ पंचायतीचे सरपंच हे पद ओपन महिलेसाठी सुटले आहे.हा एक योगायोगच म्हणावा की आणखी काय?
0 टिप्पण्या