चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-राज्यभरातील नागरीक उच्च तापमा- नाने हैराण झाले आहेत.तसे उदगीर तालुक्यातील हाळी-हंडरगुळी आणि परिसरातील आमआदमीही अति उष्णतेमुळे हैराण व घामाघुम झाले आहेत.सध्या पारा ४०+ आहे.तर मे मध्ये कसा असेल.अशी चर्चा जनता करत असतात.सध्या सुर्यदेव कोपला असल्याने हंडरगुळीपरिसर तापला असून भर दुपारी बाजारपेठेत तसेच गल्लीबोळात पसरलेला सन्नाटा बघून "इतना सन्नाटा क्यूं है,भाई" असे सुर कानावर पडतात.
गत कांही दिवसापासून सुर्यदेव हळी भागावर कोपल्याने हा भाग उष्णतेने लालेलाल झाला आहे.तर जनता घामाघूम झाली आहे.स.१०-३०नंतर घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. व भरदुपारी तर उष्णतेबद्दल विचारु नये!इतके चटके बसू लागतात.आनी या चटक्यापासून वाचण्यासाठी जो , तो आपापल्यापरीने मेहनत घेतोय.
*सावली झाली नाहीशी..!*
सध्या उन्हाचे जोरदार फटके/चटके बसू लागल्याने ञस्त झालेली जनता झाडांच्या सावलीचा आधार शोधत आहेत.पण आजकाल सगळीकडे झाडे लावा साॅरी झाडे तोडा ! ही मोहिम सुरु असल्याने गावात तसेच शेतशिवारात सावली देणारे डेरेदार झाडीच दिसत नसल्याने सावलीही नाहीशी झाली आहे.
*तीचा लपंडाव वाढला..!*
उन्हाळा सुरु होताच सगळीकडून तिची म्हणजे विजेची मागणी वाढते. आणि तिचा पुरवठा माञ कमी होतो परिणामी तिचा लपंडाव वाढतो.तसा हाळी वीज उप केंद्रांतर्गत येणा-या सर्व गावक-यांच्या जीवाची तगमग होऊ लागली आहे.आणि याला वीज वितरण व्यवस्थेचा कारभार कारणीभूत आहे.तेंव्हा परवाच बिलात मोठी वाढ केलेल्या महावितरणवाल्यांनी किमान उन्हाळ्यामध्ये तरी लपंडाव कमी व पुरवठा योग्य दाबात करावा, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
कारण,सध्या हाळी-हंडरगुळी @40 + अंशावर पारा गेला आहे.
0 टिप्पण्या