Ticker

6/recent/ticker-posts

कुडूवाडीत गायीच्या कत्तलीचा पर्दाफाश – पोलिसांकडून सुमारे ५१,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कुडूवाडी शहरातील कुरेशी गल्ली येथे छापा टाकत गायीच्या कत्तलीसाठी वापरण्यात येणारे जनावरे व गोवंश मांस जप्त करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण ५१,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, कुडूवाडीतील कुरेशी गल्ली येथे गोवंश जनावरांची कत्तल केली जात असून, त्यांचे मांस विक्रीसाठी खुलेआम ठेवलं जात आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी (करमाळा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली:

1. इस्माईल अबुतालीब कुरेशी (वय २७)
2. रौफ हनीफ कुरेशी (वय २५)
3. अखिल शफीक कुरेशी (वय ४९)
सर्व आरोपी कुडूवाडी येथील रहिवासी असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोवंश मांस, पाय, मुंडी तसेच जिवंत गोवंश जनावरे जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील खालीलप्रमाणे:

इस्माईल कुरेशीच्या दुकानातून २१००० रुपये किंमतीचे १०५ किलो वजनाचे मांस, पाय, मुंडी व गायीचे कातडे जप्त.

अखिल कुरेशीच्या दुकानातून १०,२०० रुपये किंमतीचे ५१ किलो मांस आणि ५,००० रुपये किंमतीचे २५ किलो मांस जप्त.

तसेच, त्याच दुकानाजवळून सात गोवंश जनावरे जप्त – ज्यांची अंदाजे किंमत १५,५०० रुपये आहे.


या सर्व गोष्टीची खातरजमा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी तपासणी करून हे मांस प्रथमदर्शनी गोवंश जातीचे असल्याचा अभिप्राय दिला. मांसाचे नमुने सॅम्पल म्हणून ताब्यात घेण्यात आले आहेत.

सदर प्रकरणात आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 3(5) व 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रथम खबर अहवाल क्र. 0175/2025 अंतर्गत कुडूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या