चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापुर: ग्रामदैवत श्री भगवंत जयंतीनिमित्त मातृभूमी प्रतिष्ठान आणि श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांच्या हस्ते रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन, बार्शी येथे झाले.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी "भारतीय चित्रपट सृष्टीतील माझी सहा दशके" या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीतील अनुभव, आव्हाने आणि यशस्वी क्षणांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष भोसले (संस्थापक संचालक, LI CARE FOUNDATION, मुंबई) होते. यावेळी अॅड. अनिल पाटील, रजनीश खनुजा आणि अॅड. वासुदेव ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मातृभूमी प्रतिष्ठान आणि श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने सर्व नागरिकांना या व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. कार्यक्रमाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0 टिप्पण्या