चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-भद्रावती शहरातील गावठाण जमिनी चा सि,टी,सर्वे करून नागरिकांना आखीव पत्रिका देण्या बाबत गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालु असुन येथील अधिकारी वर्गा च्या हेतू पुरस्पर दुर्लक्ष पना मुळे भद्रावती शहराचा सिटी सर्व्हे चे काम थंड बस्त्यात पडुन असल्याने नागरिकांना अनेक योजने पासून वंचित रहावे लागत असल्याने तात्काळ गावठाण जमिनी चा सि टी सर्वे करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार बाबत चे निवेदन सौ, मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर यांनी मा, जिल्हा अधीक्षक, भुमी अभिलेख चंद्रपूर व मा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन दिले,या बाबत सविस्तर व्रुत असे कि,
भद्रावती शहरातील गवराळा वार्ड व तसेच विविध ९ वार्ड मध्ये गावठाण असून येथील नागरिक पिढ्यानपिढ्या पासून १०० वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासून येथे राहत असून सुद्धा येथील नागरिकांच्या प्रॉपर्टी, जमिनीची, घरांची कुठेही नोंद नाही व रेकॉर्ड सुद्धा नाही त्या मुळे येथील नागरिकांना जमिनीची आखीव पत्रिका मिळत नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळत नाही तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजने पासून देखील वंचित राहावे लागत असल्याने व मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी पुरावा नसल्याने वणवण भटकावे लागत आहे, केंद्र शासन पुरस्कृत स्वामित्व योजनेअंतर्गत घरे आणि जमिनीचे मोजमाप ड्रोनद्वारे करण्यात येणार होते, जिल्ह्यातील १५ तालुक्यातील गावठाणातील मिळकत धारकांच्या मिळकतीचे मोजमापण करण्यात येणार होते, परंतु भद्रावती शहरातील गावठाणचा मोजमापीला अजूनहि सुरवात झालेली नाही, त्यामुळे या ड्रोनद्वारे कार्यक्रमाद्वारे अचूक व जलदगतीने सर्व्हेक्षण होणार असून या द्वारे शासनाच्या मालकीच्या मिळकतीने संरक्षण होणार आहे, या शिवाय नागरिकांच्या नागरी हक्काचे संबर्धन होणार आहे. ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या महत्वाकांशी प्रकल्पद्वारे गावातील घरे, रस्ते, शासनाच्या नगर परिषद च्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळतीचा नकाशा तयार होईल,
या शिवाय कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख, मिळकत पत्रिका स्वरूपात तयार होणार आहे, या द्वारे नागरिकांनाही विविध फायदे होणार आहेत मिळकत पत्रिका तयार झाल्याने त्या वर कर्ज घेणे सुलभ होणार आहे, गावठाण भूमापनाची प्रक्रिया पारदर्शपणे करता येणार आहे, असे उप अधीक्षक, उपजिल्हा अभिलेख कार्यालय येथील अधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु आर्डनस फॅक्टरी चांदाचे जनरल मॅनेजर यांनी ड्रोन द्वारे मोजणीला विरोध करीत असल्याने गावठाण मोजणीचे काम थंड बस्त्यात पडले आहे.
तरी मा. जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, व जिल्हाधिकारी साहेब यांनी जातीने लक्ष देऊन मौजा गवराळा गावठाण तसेच भद्रावती शहरातील गावठाणचा सिटी सर्व्हे करून तात्काळ येथील नागरिकांना जागेची आखिव पत्रिका देण्यात यावे अन्यथा आंदोलन करू,सौ, मिनलताई आत्राम, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर यांनी असा इशारा शासनास दिला


0 टिप्पण्या