Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीकरांना प्रतिक्षा आहे सरपंचपदाच्या आरक्षणाची .....


ईलेक्शन व आरक्षणाकडे लागले 2 आमदारांचे लक्ष.....!!
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर शहरानंतर तालुक्यात तसेच राज्यात गुरांच्या बाजारसाठी प्रसिध्द  असलेल्या हंडरगुळी या गावच्या ग्रा. पं.ची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या कांही महिण्यावर आली आहे. त्यापुर्वी सरपंचपदाचे आरक्षण हे दि. २४ रोजी तहसील कार्यालय,उदगीर येथे होणार आहे.म्हणुन सोडतीकडे हाळी-हंडरगुळीकरांचे लक्ष आहे. १५ सदस्य असलेल्या वरील दोन्ही गावच्या ग्रा.पं.च्या निवडणुका या वेळेस खुपच रंगतदार तसेच अटीतटीच्या होणार यात शंका नाही. कारण,गतवेळेस एकञ लढलेले विरोधात तर गतवेळेस विरोधात लढलेले आता आगामी निवडणुकीत एकञ लढतील.यामुळे यावेळेस कोण,कोणते "प्लॅन" करतात.याकडे जनतेसह इच्छूकांचेही लक्ष आहे. येत्या निवडणुकीत सरपंच हे थेट जनतेतून होणार असल्यामुळे जनता व मतदार यांचे लक्ष सरपंचपदाचे आरक्षण कोणाला?याकडे लक्ष आहे तर विद्यमान सरपंच,उपसरपंच वेट & वाॅचच्या भुमिकेत आहेत.   
येत्या गुरुवारी हाळी-हंडरगुळीसह तालुक्यातील ८७ ग्रा.पं.च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामध्ये अनु.जाती.२२अनु.जमाती 2 ना.मा.प्र.२३ आणि खुला.४० असे आरक्षण सरपंचपदाचे सुटणार आहे.  आणि यात ५० टक्के सरपंच महिला वर्गांसाठी आरक्षित असेल.
 *मोठ्या व फेमस ग्रामपंचायती*
असलेल्या हाळी-हंडरगुळी या दोन गावात सध्या O.B.C.चे सरपंच आहे व त्यांच्या पॅनलचे प्रमुख हे आमदार अमित देशमुख,आ.संजय बनसोडे यांच्या"टाॅप थ्री"मधील अतिविश्वासू आहेत.म्हणुन सरपंचपदाचे आरक्षण व ईलेक्शन याकडे वरील आमदारांचे लक्ष असेलच ! यात शंका नाही..
*सरपंचपदासाठी इच्छूक असलेल्या व्यक्तींना वेळ मिळावा म्हणुन प्रथम सरपंचपदाचे आरक्षण मग वार्डाची रचना व वार्डाचे आरक्षण.असे असते प्रशासनाचे नियोजन.म्हणुन आम्ही वेट & वाॅचच्या भुमिकेत आहोत.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर यांनी दिली*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या