भंडारा:-महिला पतंजली समिती(महा.पूर्व)योगिनी योग वर्ग सिविल लाइन्स गार्डन,भंडारा च्या वतीने २३/४/२०२५ ते २६/०४/२०२५ पर्यंत योग विज्ञान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
२३ एप्रिल रोजी उद्घाटन दिवशी योग शिक्षिका वैशालीताई गिरीपूंजे , यानी मनकी शांति,मेडिटेशन, व विविध रोगोपचारावर प्रशिक्षण चे धड़े दिले. दुसऱ्या दिवशी(२४ एप्रिल रोजी) कल्पनाताई चांदेवार , रजनीताई बालपांडे,ममता पडोळे यांनी बीपी ,शुगर,थायरॉईड, टाळीयोगा ई वर योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले.तिसऱ्या दिवशी(२५ एप्रिल ला) योग शिक्षिका अनिताताई खेडीकर यांनी सूर्य नमस्कार,मुद्रा,प्राणायाम तथा योग शिक्षिका मंजुषा डवले यांनी जलनीती चे प्रात्यक्षिक करून दाखविले, स्वातीताई कटरे यांनी योग_प्राणायाम,व घरेलु उपचारांवर योग्य ती माहिती दिली. चौथ्या व अंतिम दिवशी समारोपिय कार्यक्रम घेण्यात आले. या मधे जयश्री भुरे,ज्योती पटले, आशा गिरीपुंजे ई. नी सूर्यनमस्कार,ध्यान,यौगिक जॉगिंग ई करून दाखविले.
या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी मा.राज्य कार्यकारिणी सदस्य मा.सत्यनारायण जी अनमदवार,भा.स्वा.जिल्हा प्रभारी डॉ.रमेश खोब्रागडे , किसान सेवा समिती चे मा.सुरेश पांडे, प.यो. स.चे जिल्हा प्रभारी मा.रत्नाकर जी तिडके,राज्य कार्यकारिणी सदस्य सौ.कांचन ताई ठाकरे, म. प. यों. स.भंडारा च्या जिल्हा प्रभारी सौ.वैशाली ताई गिरीपुंजे , डॉ.दीपक निर्वाण, डॉ.अजय बत्रा ,युवा कार्यकर्ता गुरुभाऊ लीचडे ई.मान्यवर पाहुणे मंचावर उपस्थित होते. डॉ .रमेश खोब्रागडे यांनी जलनीती,रबर निती चे प्रात्यक्षिक करून दाखविले.डॉ.बत्रा, डॉ.निर्वाण यांना समिती तर्फे मोमेंटो देवून सत्कार व सन्मानित करण्यात आले तसेच सर्व मान्यवर पाहुण्यांना रोपटे व अंग_वस्त्र देवून सत्कार करण्यात आले. स्वातीताई कटरे,रजनी बालपांडे, जयश्री भुरे, ज्योती पटले ई दिंना म.प.यो.स. कडून कांचंनताई ठाकरे यांचे हस्ते जॅकेट वाटप करण्यात आले.सूत्र संचालन अनिताताई खेडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पनाताई चांदेवार यांनी.कार्यक्रमांत महिला योग साधकांची आवर्जुन उपस्थिती होती. अल्पोहार व ताकपेय चां सर्वांनी आस्वाद घेतला.योगिनी योगवर्ग सिविल लाइन गार्डन च्या समस्त महिला योगसाधकांनी सहकार्य केले.मंजूषाताई डवले, स्वातीताई कटरे यांनी संपूर्ण कार्यक्रमा करिता विशेष सहकार्य केले.पोलिस चौकी चे गार्ड श्री कठाने यांचे ही सहकार्य लाभले.
मा.जिल्हा प्रतिनिधी/ वार्ताहर


0 टिप्पण्या