अंतिम सामन्यात सुरत ब संघाचा धुळे संघावर दणदणीत विजय
चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक:-नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळ तर्फे नुकतेच गुरव समाज प्रीमियर लीग (GSPL) २०२५ क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन मुरलीधर गामणे क्रीडांगण, पाथर्डी फाटा येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक (से.नि.) व ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. पद्माकरजी देवरे, जेष्ठ उद्योजक श्री. उद्धव गांगुर्डे, यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गुरव समाज उन्नती संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत गुरव, श्री. रवींद्र गामणे, श्री. रमेश जगताप, श्री. आप्पासाहेब बाविस्कर, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, अँड. सुरेंद्र सोनवणे, डॉ. अशोक गुरव, अँड. पवन गुरव, श्री. विजय बाविस्कर, श्री. संजय गुरव, श्री. भावेश गुरव आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्यांना सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री. पद्माकर देवरे यांनी आपल्या भाषणात नाशिक गुरव समाज विकास मंडळाने भव्यदिव्य अशी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करून समाजातील पोट जाती व समाज बांधवाना एकत्र आणण्यासाठी व तरुणांमध्ये खेळा बाबत जागृती करण्याचे व एकसंघ भावनेने कार्य करण्याचा संदेश दिला आहे. समाजातील पोट जाती एकत्र आणण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलेले आहे.
पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे नाशिक पश्चिम विधानसभा आमदार सौ. सीमाताई हिरे, जेष्ठ भाजपा नेते श्री. महेश हिरे, गुरव समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. बापू छबिलाल गुरव, सुरत गुरव समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री. लीलाकांतजी गुरव, श्री. गोपाळ गुरव, गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शशिकांतजी गुरव, धुळे गुरव समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदलाल गुरव, ज्येष्ठ समाजसेवक श्री एन. टी. गुरव, दहिगाव गुरव मंडळाचे अध्यक्ष श्री. सतिशजी गुरव, दाहिगाव गुरव समाजाचे मा. अध्यक्ष श्री. नगीन बद्रीनाथ गुरव, शैव गुरव संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गुलाबराव सोनोने, श्री. शिरिषजी गुरव आदी उपस्थित होते. प्रत्येक सामन्याच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करण्यात आली व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तीन राज्यातील विविध शहरातून एकूण २१ संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या दिवशी साखळी पद्धतीने सामने खेळण्यात आले. या स्पर्धेत अतिशय उस्फुर्त रित्या गुरव समाज बांधवांकडून सहभाग घेण्यात आला. तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पहिला दिवस पार पाडला. यात काही संघाना विजय तर काहींना पराजय स्वीकारावा लागला.
दुसऱ्या दिवशी उर्वरीत साखळी सामने तसेच उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरीचे व अंतिम सामना खेळण्यात आले.
दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि हेड कोच श्री. योगेश कौदारे यांची विशेष उपस्थिती होती. श्री. योगेश कौदरे यांनी गुरव समाजातील खेळाडूंसाठी भविष्यात प्रशिक्षण अकादमी लवकरच सुरू करू व खेळाडूना मोठमोठया स्पर्धां मध्ये निवडीसाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख पाहुणे गुरव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. नवल गंगाराम शेवाळे, गुरव समाज उन्नती संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत मधुकर गुरव, गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.पद्माकर पंढरीनाथ देवरे, निफाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश चंद्रकांत गुरव, भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष श्री.किशोर मन्साराम अहिरे, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ. निर्मलाताई सावंत, फायर ब्रिगेड मुंबई चे अधिकारी श्री. प्रशांत गुरव, गुरव समाज उन्नती संस्थेचे मा. अध्यक्ष श्री. बापूसाहेब छबुलाल गुरव, गुरव समाज उन्नती संस्थेचे मा. खजिनदार श्री.संजय रामकृष्ण गुरव, सुरत गुरव समाजाचे अध्यक्ष श्री लिलाकांत परशराम गुरव, मालेगाव गुरव समाजाचे अध्यक्ष श्री राहुल रमेश गुरव, शहादा गुरव समाजाचे अध्यक्ष श्री विशाल गिरीधर गुरव, दाहिगाव गुरव समाजाचे अध्यक्ष श्री. सतीश ब्रिजलाल गुरव, दाहिगाव गुरव समाजाचे मा. अध्यक्ष श्री. नगीन बद्रीनाथ गुरव व श्री सुधाकर रमेश गुरव, जेष्ठ समाज सेवक श्री.जगन्नाथ गुरव, मा. सभापती, मनपा, नाशिक श्री.अमोल जाधव, चेतना नगर विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश जगताप, दिर्घयुषी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अरविंद अत्तरदे, अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष चंद्रकांत शिंदे, अखिल गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री भाऊसाहेब रामचंद्र पवार, अखिल गुरव समाज संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री अशोक मारुती पांडे, शैव गुरव संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गुलाबराव सोनोने, गुरव सोशल फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंकर राधाकिसन कौदारे, अखिल गुरव समाज संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सौ मनिषाताई मनोज पांडे, निवृत्त पोलीस अधिकारी श्री. मनोज पांडे, पत्रकार श्री. मनोज सुकलाल गुरव आदी उपस्थित होते.
अंतिम सामना सुरत येथील *सुरत ब* व *धुळे सुपर ११* या संघात खेळवण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात *सुरत ब* संघाने दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात पार्थ विजय गुरव सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज श्री विजय गुरव, उत्कृष्ट फलंदाज पार्थ गुरव, स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडु म्हणून अष्टपैलू खेळाडू पार्थ गुरव यास गौरवण्यात आले.
प्रसिद्ध योग व फिजियोओथेरपिष्ट डॉ. श्री.अशोक दिगंबर ठाकरे व डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी दोन दिवस आपली वैद्यकीय सेवा दिली.
इतर राज्यातून व शहरातून आलेल्या तमाम समाज बांधव व खेळाडूंना राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. दोन दिवस असलेल्या या स्पर्धेस मोठ्या प्रमाणात पुरुषानं सोबत महिला वर्गाची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले होते, या थेट प्रक्षेपणाचा लाभ देशभरातील हजारो समाज बांधवांनी घेतला.
सामन्यांचे समालोचन श्री. हर्षद गुरव, दिपक खैरनार, धनराज गुरव, अभिजित गुरव, अजिंक्य गुरव, योगेश गुरव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सुरेंद्र सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन अँड. पवन गुरव, विजय बाविस्कर यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पुंडलिक आप्पां बाविस्कर, अध्यक्ष अँड. पवन गुरव, सचिव विजय बाविस्कर, अँड. सुरेंद्र सोनवणे, नंदकिशोर सोनवणे, रमेश महाले, सुरेश सोनवणे, सुनिताताई गुरव, श्री विनायक भामरे, श्री प्रकाश यशवंत सुर्वे, श्री सदाशिव गुरव, श्री दिनेश बाविस्कर, श्री धनराज गुरव, प्रसिद्धी प्रमुख श्री विकास बाविस्कर
*युवा अध्यक्ष श्री हर्षल किसन गुरव, श्री दिपक रवींद्र खैरनार , श्री मंगेश गोपाळ बाविस्कर, श्री प्रणव रमेश गुरव, श्री प्रथमेश विजय गुरव, श्री चेतन राजेंद्र गुरव, चि. भुषण दिलीप सूर्यवंशी, श्री. ज्ञानेश्वर भास्कर गुरव, श्री निलेश गोविंदराव खैरनार, श्री हर्षल अनिल गुरव, श्री प्रमोद मधुकर गुरव, श्री योगेश पुरुषोत्तम गुरव, श्री आशिष रमेश गुरव, श्री कमलाकर खैरनार, श्री राकेश खैरनार, चि.कौशल प्रदीप गुरव, चि.प्रतिक सदाशिव गुरव, श्री कुणाल दिलीप सूर्यवंशी, श्री सुधीर नंदकिशोर सोनवणे, श्री महेश रमेश सूर्यवंशी, युवा सदस्य कौस्तुभ विजय बाविस्कर, शुभम कैलास महाले, नमन सुरेंद्र सोनवणे आदीनो विशेष प्रयत्न केले. यावेळी समाज बांधव व महिलांची विशेष उपस्थिती होती.
.
0 टिप्पण्या