Ticker

6/recent/ticker-posts

22 गोवंशाचा कंटेनर कत्तल खान्याकडे निघाला ; वाढवणा पो.स्टे.मधील ञिमुर्तीं नी हंडरगुळी जवळ तो पकडला


3 आरोपींमध्ये 2 परप्रांतिय आरोपी

लातूर :-गोवंश हत्याबंदी कायदा असताना सुध्दा एका कंटेनर मध्ये दाटीवाटीने तब्बल 22 गोवंश कत्तलीसाठी जात आहे.अशी 'टीप' मिळताच वाढवणा पोलीस ठाण्यातील हे.काॅ.संजय पा. दळवे,हे.काॅ.शिवप्रताप रंगवाळ व हे.काॅ.तुकाराम बळदे या * ञिमुर्ती * ने हंडरगुळी ते उदगीर रोडवरील सुकणी या गावाजवळ 'ट्रॅप' लावुन  31 मे 25 च्या पहाटे 3 वा.दरम्यान  पकडला आहे.या 'रेड' मध्ये तीन आरोपींना बेड्या ठोकून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या 'धडाकेबाज' कामगिरीबद्दल पोलीसांचे सर्वस्तरातून कौतूक होत असलेतरीही या धंद्यामागचा खरा *आका*कोण? याचा शोध *खाकी*वाल्यांनी घ्यायला पाहिजे. कारण,हंडरगुळीत २९ मे २५ रोजी बकरी ईद निमित्य झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गोवंशाची अवैध वाहतूक व विक्री तसेच कत्तल या बद्दल सपोनी.बी.एस.गायकवाड यांनी कडक *वाॅर्नींग*देऊनही या मार्गे कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक होतेच कशी? या मागे ग्रा.पं.च्या 'त्या' १ सदस्याचा तर हात नाही,ना? तसेच या धंद्याचा खरा *आका*तर 'तो' नाही,ना? याचा शोध वाढवणा ठाण्यातील *जाॅंबाज*पोलीसं घेतील का? असे प्रश्न सुज्ञ हाळीकरांमधून चर्चीले जातात.
या बाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, 31 मे रोजी KA-38 A- 7265 या नंबरचा व ईटकरी कलरचा एक जुना कंटेनर कत्तलीसाठी परप्रांताकडे 22 गोवंश घेऊन जात आहे.अशी 'टीप' विश्वासू 'बातमीदाराने' दिल्यामुळे वरील 'ञिमुर्तीं' नी क्षणाचाही विलंब न लावता वरीष्ठ अधिका-यांच्या सल्ल्यानुसार 'ट्रॅप' लावला आणि 'टीपरने' दिलेल्या वर्णनाचा एक कंटेनर हंडरगुळी ते उदगीर रोडवर आला असता त्या संशयीत कंटेनरला अडविले आणि तपासणी केली,तेंव्हा ईटकरी रंग व 8 फुट रुंद व 24 फुट लांब असलेल्या कंटेनरमध्ये अंत्यात दाटीवाटीने हालचालही करता येत नव्हती,इतक्या क्रूरपणे तब्बल 22 गोवंश कोंबलेले आढळले.आणि हे सर्व गोवंश कत्तलीच्या उद्देशानेच पर राज्यात घेऊन जात असल्याचे स्पष्ट निदर्शनास आल्यावरुन 'जाॅंबाज' हेकाॅ.संजय पा.दळवे यांनी फिर्याद दिली म्हणुन,वाढवणा पो.ठाण्यात गुरनं.१५४/२५,कलम ५ (अ) ५ {ब} ९,११ महाराष्ट्र पशू संरक्षण सुधारणा अधिनियमन १९७६ सहकलम ११ (१) , D.E प्राण्यास निर्दयीपणे वागविण्यास अधिनियम सन १९६० सह कलम ६६ (१) १९९२ मोटार वाहन अधिनियम या नूसार आरोपी {१} पुंडलिक सिताराम बिरादार, वय.५६ {रा.हंचनाळ,ता.देवणी} (२) अनिल वेंकट भोई (वय.२५मलखेड ता. हूमनाबाद,जि.गुलबर्गा) {३} नागेश शरणअप्पा भोई,वय.३५ हळीखेड ,ता.हुमनाबाद,जि.गुलबर्गा या तीन आरोपींविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भात वाढवणा ता.उदगीरच्या 'ञिमुर्ती' पोलीस जमादारांनी बावीस निष:पाप गुरांना कत्तलखान्यात जीवानिशी जाण्या - पासून वाचविले. तसेच या गंभीर गुन्ह्यात वापरलेले जुने कंटेनर त्याची किंमत अंदाजे 6 लाख रु.आणि गोवंशाची किंमत अं. 8 लाख 95 हजार,असा एकुण 14 लाख 95 हजारांच्या मुद्देमालासह पर प्रांतीय दोन व महाराष्ट्रीयन एक असे तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हेकाॅ. शिवप्रताप रंगवाळ हे करतात.

गोशाळा व पोलीसांबद्दल संशय 
घेतला जात असतानाच वाढवणा ठाण्यातील ञिमुर्ती हेडकाॅन्सटेबलनी ही धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे पोलिसांविषयीचा संशय कांही अंशी कमी झाला असलातरी अन्य काळ्या धंद्याविषयी शंकाकुशंका जाणकार जनतेतून व्यक्त होतातच ! 

शांतता समिती बैठकीत वाॅर्निंग देऊन सुध्दा १ नव्हे,२ नव्हे,३नव्हे तर तब्बल २२ गोवंशाची दाटीवाटीने व अंत्यत क्रूरपणे विनापरमीट वाहतूक ते पण कत्तलीसाठी होतेच कशी ? यामागचा *आका*कोण? याच्या मुळाशी *खाकी*वाले जाणार का ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या