चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-महिला पतंजली व माॅ शारदा योग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर वार्ड स्थित शारदा माता मंदिर येथे 3 दिवसीय योग शिबिराचे उद्घाटन नगरसेविका हर्षाताई बावनकर, डॉ. कोल्हे मॅडम ,महिला जिल्हा प्रभारी सौ वैशाली गिऱ्हेपुंजे, कल्पना चांदेवार ,सौ.रजनी बालपांडे तसेच माॅ शारदा भजन मंडळ यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे रोपटे व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन सत्र सौ. कल्पना चांदेवार व सौ ज्योती पटले यांनी घेतले. या शिबिरास मिस्किल गार्डनमधील योग साधिका तसेच संत कबीर वार्ड मधील योग साधिका योग शिबिरात सहभागी झाल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता माॅ शारदा योग वर्गातील सर्व योगसाधिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे पावसाचं वातावरण असून देखील साधकांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला.
0 टिप्पण्या