Ticker

नादुरुस्त उभ्या कार वर कंटेनर ची धडक सदर भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू कॅन्टेनर चालक ने केला पोबारा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे :-एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात  26 मे रोजी पावसाचे झोडपने सुरु असताना बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर जिकडे तिकडे मृतकाचे मृतदेह पडलेले होते.
प्राथमिक माहितीनुसार, गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यामुळे हे सहा लोक गाडी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा सैरावैरा वेगाने येणाऱ्या कंटेनरने थेट त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चुराडाच झाला. मृतांमध्ये सहा जणांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच  पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. व मृतदेह तेथील रुग्णालयात हलवण्यात आले असून अपघातग्रस्त कंटेनर चालkane घटनास्थळावरून फपोबारा केला असून. पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहॆ. या घटने ची माहिती गावात पसरताच जो तो घटनास्थळी धावत होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या