पत्रकार संजीव भांबोरे यांनी डॉ. उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याशी केली चर्चा
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -तालुक्यातील पहेला येथील ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 6 जून 2025 ला केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांनी डॉ.उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन विकसित कृषी संकल्प अभियान नेमकं काय या विषयावर चर्चा केली. त्यावर त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितले की, कृषी विभाग, पंजाबराव कृषी विद्यापीठ , आयसीए आर व मापसु यांच्या सहकार्याने खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत त्यावर काय उपाययोजना करता येतील, त्याचप्रमाणे कृषी संकल्प अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन संशोधन आणि विकसित केलेले तंत्रज्ञान तसेच नवीन योजना व उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवीने आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट मिळावा असे शासनाचे धोरण आहे त्याकरीता या विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दररोज तीन गावात दिनांक 29 मे ते 12 जून पर्यंत करण्यात येत असून त्याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी आयसीएआर शास्त्रज्ञ मनोज कुमार, अशोक जिभकाटे मंडळ कृषी अधिकारी पहेला , कांचन तायडे विषय तज्ञ, प्रवीण खिरारी विषय तज्ञ पशुसंवर्धन , अभिषेक हटवार सहायक कृषी अधिकारी ,गोपाल उरकुडे, ,रमेश थोटे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यामिनी बांडेबुचे माजी जि.प सदस्य, सरपंच मंगला ठवकर, प्रज्वल शिवरकर, प्रकाश बोरकुटे, सुशील बांडेबुचे उपसरपंच, सुमित्रा मळकाम, मनिषा बावनकुळे, कमला कोथरमारे, उमावती कावळे , सुनंदा मडावी, नीलिमा मेश्राम, एकादशी उरकुडे, यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या