Ticker

6/recent/ticker-posts

मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची चंद्रपूरात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. जीवतोडे यांना सदिच्छा भेट; वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :-विदर्भातील ओबीसी समाजाचे अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि दूरदृष्टीसंपन्न नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या डॉ. अशोकजी जीवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज चंद्रपूर येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या खास प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री  डॉ.अशोकजी नेते यांनी त्यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत, पुष्पगुच्छ अर्पण करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान, डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सांगितले —
         "मा. डॉ. जीवतोडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यात अधिक यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विदर्भातील ओबीसी समाजाच्या  सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे."असे मा.खा.डॉ. नेते यांनी भेटी दरम्यान व्यक्तव्य केले.

या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, चंद्रपूर  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशभाऊ पाल, पंकज लाडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या