चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदूरबार तर्फे भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना "तीनपाट" असा जातीवाचक शब्दप्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस ठाणे शहादा येथे ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल न करीत असल्याविरोधात,ॲस्ट्रासिटी संबंधित गुन्ह्य़ातील आरोपींना पोलीस अटकच करत नसल्याविरोधात,आदिवासींवर वारंवार होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात, ॲस्ट्रासिटी कायदा संरक्षणासाठी दिनांक १२ जून २०२५ रोजीच्या शहादा तालुका बंदचे आवाहन केले होते.शहादा शहर कडकडीत बंद पाडून आमदार चंद्रकांत रघुवंशींचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.या बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल शहादा शहरातील सर्व व्यापारी,व्यावसायिक,दुकानदारांचे आदिवासी संघटनांनी आभार व्यक्त केले आहे.
अनुचित प्रकार घडू नये,म्हणून शहादा शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी काही आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतला.तेव्हा काही काळ तणाव निर्माण झाला.आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यासमोर हजारों लोकांनी गर्दी केली. आम्हालाही ताब्यात घ्या,अशी आंदोलन कर्त्यांनी मागणी केली.परंतू पोलिसांनी जास्त गर्दी बघून पोलीस ठाण्यासमोरील लोकांना ताब्यात घेण्यास नकार दिला.बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना,भारतीय स्वाभीमानी संघ,बिरसा आर्मी ,भीलवंश ग्रूप शहादा,आदिवासी टायगर सेना,बिरसा ब्रिगेड इत्यादी विविध आदिवासी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला.
0 टिप्पण्या