Ticker

6/recent/ticker-posts

भावेश कोटांगले यांना अ.भा.नाट्यपरिषदेचा उत्कृष्ट लोककला पुरस्कार जाहीर

१४ जून रोजी मुंबई येथे होणार सन्मान


 चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा उत्कृष्ट लोककला पुरस्कार प्रबोधनकार कला व साहित्य संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष, उत्कृष्ट लोककलावंत व एकोडी ग्रा.पं.चे सदस्य भावेश कोटांगले यांना जाहीर झाला असून येत्या १४ जून २०२५ रोजी परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता प्रशांत दामले व उपाध्यक्ष झाडीपट्टी रंगभूमिवरील सुप्रसिद्ध नाट्य कलावंत नरेश गडेकर यांच्या हस्ते मुंबई येथे कोटांगले यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

       सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी नाट्यकर्मीना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कृत कै. शाहिर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर, कै आनंद अभ्यंकर स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट लोककला पुरस्कारासाठी यावर्षी एकोडी येथील भावेश कोटांगले यांची निवड करण्यात आली आहे.

      सदर  पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. १४ जून २०२५ रोजी दु.४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, मनमाला टैंक रोड, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल चित्रपट अभिनेता प्रशांत दामले, नरेश गडेकर, प्रबोधनकार कला व साहित्य संघटना, झाडीपट्टी वादक संघटना व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या