चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-सावली तालुक्यातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांसाठी ही बातमी म्हणजे एक मोठा दिलासा व आनंददायी आहे! यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत NT प्रवर्गातील ५४८ लाभार्थ्यांना घरकुलं मंजूर झाली होती. पण, निधी अभावी ती कागदावरच राहिली. खात्यावर पैसा न आल्यामुळे अनेकांचे स्वप्न अधुरं राहिलं, आणि चिंता वाढली.
याच योजनेचा एक लाभार्थी व्याहाड बुज ग्रामपंचायतीत आला असता, त्यावेळी पंचायत समितीचे नैताम बाबू हे देखील तिथे उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण तालुक्याच्या घरकुल योजनेची अडचण समजावून सांगितली. हा विषय गांभीर्याने लक्षात घेत व्याहाड बुज ग्रामपंचायत सदस्य आणि माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे विशेष सहाय्यक व सोशल मिडीया प्रमुख श्री. दिवाकर गेडाम यांनी तात्काळ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला.
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी थेट मुंबई गाठली आणि पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अधिकृत निवेदन सादर करून, वेळोवेळी पाठपुरावा करत शेवटी त्यांनी शासनाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५४८ घरकुलांसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला!
ही बातमी समजताच संपूर्ण सावली तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे.
झोपडीत दिवस काढणाऱ्या कुटुंबांना आता स्वतःचं एक छोटंसं पण हक्काचं घर मिळणार आहे.हाच प्रयत्न व पुढाकाराने साकार होतोय मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या सहकार्याने झाले हा खरा आनंद आहे.
लोकांनी गावागावातून, सोशल मिडीयावरून मा.खा. डॉ. अशोकजी नेते, डॉ. उईके, आणि जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.
अनेकांनी भावना व्यक्त करत म्हटलं –
"ही घरकुलं म्हणजे आमचं स्वप्न होतं... आता ते खरंच पूर्ण होतंय!"
"शासनाच्या योजना वेळेवर आणि योग्य पद्धतीनं पोहचवल्या, तरच खरा ग्रामीण विकास घडतो,"
असं मत अनेकांनी व्यक्त केलं.
ही निधी मंजुरी म्हणजे सावली तालुक्याच्या विकासाच्या दिशेनं टाकलेलं भक्कम पाऊल आहे.
या निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांचं आयुष्य खर्या अर्थानं उजळणार आहे!
0 टिप्पण्या