Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीमध्ये रात्रीच्या पावसात अडकलेल्या एस.टी. बसमधील प्रवाशांचा थरार… तरुण नेत्यांनी दाखवली तात्काळ मदत!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :- रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीतील तुळजापूर रोडवरील ओढ्याला पूर आला होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखाली एक एस.टी. बस पाण्यात अडकली. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे बसमध्ये पाणी घुसू लागले आणि प्रवाशांची अवस्था गंभीर बनली.

या धोकादायक परिस्थितीत पोलीस उपअधीक्षक मा. जालिंदर नालकुल साहेब, पोलीस निरीक्षक मा. बालाजी कुकडे साहेब, त्यांचे सहकारी, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आम्ही तात्काळ बचावकार्य सुरू केलं.

या संकटकाळात बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि बार्शीचे युवा नेते रणवीर राऊत यांनी देखील घटनास्थळी उपस्थित राहून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रशासन, स्थानिक नागरिक व बचावपथक यांच्यात समन्वय साधून त्यांनी बचाव मोहिमेला गती दिली. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण प्रवासी सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळालं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सध्या बार्शी तालुक्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. नागरिकांनी अतिशय काळजीपूर्वक वागावे. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे आणि प्रवास शक्यतो टाळावा.

आपत्कालीन प्रसंगी एकजूट आणि तत्परता हाच आपला खरा बळ आहे!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या