चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटनांनी दाखवले काळे झेंडे; पोलिसांची तारांबळ!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- चोर आला चोर आला,आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर शहाद्यात आला,पळा पळा जमिनी चोरणारा चोर आला,
भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव, अशा जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्याविरोधात १६ मे २०२५ रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला.या निषेध आंदोलनात सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, रोहीदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभीमान संघ ,रवींद्र वळवी राज्य कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना, विधितज्ञ ऍड. राहुल कुवर, गोपाल भंडारी प्रदेश अध्यक्ष, बिरसा फायटर्स, पंकज वळवी जिल्हाअध्यक्ष भारतीय स्वाभीमान संघ, अजय वळवी तालुका अध्यक्ष, भारतीय स्वाभीमान संघ, योगेश गावीत सामाजिक कार्यकर्ता,सुरेश पवार,दिलिप मुसळदे सह हजारों कार्यकर्ते सहभागी झाले.
शहादा बसस्थानक जवळील चौकात चंद्रकांत रघुवंशी यांना बघताच आदिवासी संघटनांनी अचानक बॅनर हातात घेऊन काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले,त्यामुळे आदिवासी कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात पोलिसांची तारांबळ उडाली.बघ्यांची गर्दी जमत वाहनांचा चक्का जाम झाला.त्यामुळे काही वेळ वातावरण गरम झाले.पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेतले. पोलीस गाडीत आंदोलन कर्त्यांनी चोर आला अशा जोरदार घोषणा देत पोलीस ठाण्यापर्यंत आले.त्यामुळे कोण चोर शहाद्यात आला? अशी लोकांत चर्चा रंगू लागली.
भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य शिवसेना शिंदेगट यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या शेतजमीनी अवैद्य ,बेकायदेशीर, बोगस व बनावटरित्या हडप केल्या आहेत. नंदूरबार हा आदिवासी बहूल जिल्हा असल्याकारणास्तव जिल्ह्य़ातील अक्कलकुवा,शहादा,नवापूर व नंदूरबार असे ४ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असतांना ४ पैकी शहादा व नंदुरबार हे २ विधानसभा मतदारसंघ खुले मतदारसंघ करण्याची मागणी श्री चंद्रकांत रघुवंशी करत आहेत.शिवसेना शिंदे गटाच्या धडगांव येथील एका जाहीर सभेत आदिवासी लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या आरक्षणाची बाजू मांडली म्हणून आदिवासी नेत्यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाहीत, अशी जाहीर धमकी चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व मोर्चात शामिल झालेल्या आंदोलनकर्त्या आदिवासी बांधवांना शिवसेना शिंदेगटाचे जुगनी व मोडलगांव येथील सरपंच, गुंडांमार्फत चंद्रकांत रघुवंशी हे लाथाबुक्यांनी, काठ्यांनी जीवे ठार मारण्याचा कट रचून आदिवासींचा आवाज दाबण्याचे षडयंत्र करत आहेत.चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासी विरोधी भूमिका घेत आहेत, म्हणून त्यांचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदूरबार तर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करीत आहोत.येणा-या काळात चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे तिथे आम्ही काळे झेंडे दाखवू.निवडणूकीत चंद्रकांत रघुवंशी यांना व त्यांच्या शिंदे गटाच्या उमेदवारांस आदिवासी गांवात
गांवबंदी करणार आहोत, असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.
0 टिप्पण्या