Ticker

6/recent/ticker-posts

शास्त्रीनगर येथे महिला पतंजलि योग समिती चे 3 दिवसिय योग विज्ञान शिबिर चे समारोप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-दि.15/5/25 ला श्री चिंतामणि गणेश मंदिर शास्त्रीनगर भंडारा येथे महिला पतंजलि योग समिती च्या वतीने 3 दिवसिय (13/5/25   ते 15/5/26 पर्यंत) शिबिराचे समारोप कार्यक्रम नुकतेच पार पडले। पहिल्या दिवशी प्रमुख पाहूणे डाॅ.अभिलाषा महाकाळकर,डाॅ.रमेश खोब्रागडे आणि कार्यकारिणी सदस्य सौ.कांचन ताई ठाकरे आणि जिल्हा प्रभारी सौ.वैशाली ताई गि-हेपूंजे उपस्थित होते।दिप-प्रज्जवलन करून शिबिर ची सुरूवात झाली। योग सत्र सौ.कांचन ताई ठाकरे आणि सौ.अनिता ताई खेडिकर यांनी केली व प्राणायाम आ.खोब्रागडे सरांनी घेतले।दुस-या दिवशी सौ.रजनी ताई बालपांडे यांनी योगिक, जाॅगिंग व सूर्यनमस्कार ई घेतले आणि सौ.मंजूषा ताई यांनी जड्डी-बुट्टी व घरेलू उपचार विषयी माहिती दिली।तिस-या दिवशी सौ.कल्पना ताई चांदेवार यांनी बी.पी,शूगर चे योग आसने व हास्यासन,आणि जयश्रीताई भूरे व आशाताई गि-हेपूंजे यांनी प्राणायाम घेतले।समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहूणे  म्हणून सामाजिक कार्यकर्ते सईद शेख सर यांना अंगवस्त्र,औषधी रोपटे ,श्रीफळ व मोमेंटो देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले।यात रजनीताई व आशाताईं चे विशेष सहकार्य लाभले। सर्व साधक महिलांचा उत्सफुर्त सहभाग होता। सर्व साधकांना अल्पोहार आणि ताक वितरीत करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या