चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस व कामगार दिवस चे औचित्य साधून राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीराम भाऊ येवले अध्यक्ष मध्यवर्ती संघटना यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सल्लागार श्री अतुल वर्मा व मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री दिलीप रोडके, श्री प्रेम लांजेवार सहसचिव कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना हे होते.
महाराष्ट्र दिवस स्थापना व कामगार दिनाचे महत्त्व विशद करताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या न्याय मागण्या करिता सामूहिक लढा देण्याचे आवाहन श्री अतुल वर्मा यांनी केले.
श्री अशोक निमकर यांना आपले तत्कालीन अनुभव सांगितले श्री दिलीप रोडके यांनी संघटन शक्ती बाबत माहिती दिली श्री प्रेमलाल लाजेवार यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांसोबत सेवानिवृत्तांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्याबद्दल सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राम भाऊ येवले यांनी एक मे ला जागतिक स्तरावर झालेल्या रक्तरंजित आंदोलनाची माहिती दिली
सर ते शेवटी श्री विशाल तायडे यांनी आभार प्रदर्शन केले व भविष्याच्या आंदोलन बाबत माहिती दिली.
याप्रसंगी श्री एस.डी. देशमुख, श्री गौरीशंकर मस्के यांनी यथोचित भाषणे देऊन मार्गदर्शन केले या दोन संख्येने कर्मचारी हजर होते.
0 टिप्पण्या