Ticker

6/recent/ticker-posts

अ. भा. ग्राहक पंचायत (भंडारा) तर्फे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दीनावर बैठक


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा:-महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून दिनांक १ मे, २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा भंडारा व नगर भंडारा यांची बैठक श्री सिद्ध चिंतामणी मंदिर श्रद्धा पेठ भंडारा येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष पद श्री जयंत सब्जीवाले यांनी, आणि प्रमुख उपस्थिती मा. श्री नितीनजी काकडे, केंद्रीय कार्यकारिणी पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री तथा विदर्भ प्रांत सचिव आणि भंडारा जिल्हा सचिव श्री. अनिलजी शेंडे यांनी भूषविले.या बैठकीत केंद्र स्तरावरील मुद्दे आणि जिल्ह्यातील आणि नगरातील समस्यांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच त्यावर अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने संबंधित विभागासोबत निवेदने देऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
श्री. नितीनजी काकडे यांच्यावर केंद्रीय कार्यकारिणी यांनी पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री याचे दायित्व सोपविण्यात आलेले असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा भंडाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व तसा अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
पहलगाम येथे जिहादी अतिरेक्यांकडून भारतीयांची हिंदूंची नृशंस आणि अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्याबाबत तीव्र निषेध करून शोक संवेदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी रवींद्र तायडे, सब्जीवाले,अनिल शेंडे,लोकेश मोहबंसी,चंद्रशेखर साठे,संजय आयलवार,भुवनेश्वर शिवनकर,जयश्री सातोकर मैडम, प्रभा ढोके मैडम, किशन शेंडे, एस डी शेख,सुरेश वंजारी ई   मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या