Ticker

6/recent/ticker-posts

नंदलाल पाटील कापगते विद्यालय, साकोली येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश!

चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली या शाळेने यंदाही दहावीच्या निकालात यशाची परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल  90.44 % लागले असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. 
   प्राविण्य प्राप्त एकूण विद्यार्थी - 23 , प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी- 36, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी - 47 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. 
कु.अनिता राजेश्वर घरत हिने 92.20 % गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. निधी अरविंद सोनवणे हिने 89.40℅, व कु.डिंपल प्रदीप हत्तीमारे हिने 89.00℅ अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुख्याध्यापिका श्रीमती आर. बी. कापगते व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश साध्य झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
     शाळा व्यवस्थापन समिती,  विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या