Ticker

6/recent/ticker-posts

हिवताप पतसंस्थेचे मानद अध्यक्षपदी श्री डी. एस. पवार यांची एकमताने निवड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-स्वास्थ सेवा हिवताप सेवकांची सहकारी पत संस्था र. न. १४६ ची २०२५-३० या पंचवार्षिक कालावधी करिता  नुकतीच  निवडणुक  झाली आहे.  
  यामधे श्रीमती  मंजुषा देशपांडे यांची अध्यक्ष, बाळासाहेब तराळ उपाध्यक्ष,प्रकाश दातिर सचिव  व कोषाध्यक्ष पदी शिल्पा शिर्के यांची तर .संचालक म्हणून 
सर्वश्री सुरेंद्र वाडीकर , रामेश्वर नागपूरकर ,बबन खंडारे , किशोर बकाले ,भाष्कर होरे, विजय साळुंखे 
व संदीप लांडे यांची बिनविरोध निवड झाली.   
नवीन पदाधिकारी मंडळाची प्रथम सभा  संस्थेच्या कार्यालयामध्ये दिनांक १३/०५/२०२५ ला सायंकाळी ५ वाजता श्रीमती मंजुषा देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली दमदारपणे संपन्न झाली.सभेला  नवीन कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी मंडळ उपस्थित होते.आजच्या सभेत प्रस्तावित विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. तसेच सहकार क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संस्थेचे कामकाजाविषयी प्रगल्भ ज्ञान असलेले  श्री दामोदर पवार यांची मानद अध्यक्ष या  पदावर  एकमताने निवड करण्यात आली. 
स्वास्थ्य सेवा हिवताप सेवकांची सहकारी पत संस्थेमधे त्यांनी १९८७ पासून कार्य केले आहे.  संस्थेचे नियमित सभासद १४५ आहेत. ही संस्था शुन्यातून  उभी करून आज संस्थेचे खेळते  भांडवल ४ कोटीचे वर गेले आहे.  सभासदांना दिर्घ मुदती कर्ज १० लाख व तातडीचे कर्ज ५० हजार  याप्रमाणे कर्जपुरवठा  संस्था स्वफंडातुन करित आहे. लाभांश १०% व दरवर्षी विशेष नाविन्यपूर्ण भेट वस्तू,गेल्या ३० वर्षापासून संस्थेला ऑडिट वर्ग  अ मिळालेला आहे. संस्थेची प्रगतीशील भागात  रुख्मिणी नगर येथे  स्वताचे मालकीची ईमारत मोठ्या डौलाने उभी आहे. सेवानिवृत्त सभासदांनी १कोटिच्या वर ठेवी मोठ्या विश्वासाने  ठेवलेल्या आहेत.संस्थेचे व्यवहार पारदर्शक आहे.संस्थेचे कार्यावर सभासदाचा विश्वास आहे संस्थेचे आर्थिक प्रगतीमध्ये  श्री पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्याची, अनुभवाची व ज्ञानाची गरज संस्थेला आहे. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभावे यासाठी  आजच्या सभेत त्यांची सहयात मानद अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.  त्यांची मानद अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंजुषा देशपांडे यांचेसह  उपस्थित सर्व सहकार्यांनी अभिनंदन केले  व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री दामोदर पवार यांची संस्थेचे मानद अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल संस्थेच्या सभासदांनी त्याचेवर शुभेच्छाचा वर्षाव केला.त्याचे मित्र मंडळी व स्नेही जनांनी त्यांना दुरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या. श्री.प्रकाश दातीर संस्थेचे सचिव यांनी सुत्र संचालन करून उपस्थितांचे आभार मानले. मा. अध्यक्षाचे परवानगीने सभेची सांगता झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या