Ticker

6/recent/ticker-posts

श्री विवेकानंद कन्या विद्यालयाच्या नभांगणातील 10वी बोर्ड परीक्षेतील चमकणारे यशस्वी तारे



चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्यमाध्यामिक शिक्षण राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 2024 - 25 सत्रातील SSC बोर्ड परीक्षेत यशप्रथित श्री विवेकानंद सेवा संघ लेहेगांव ' द्वारा संचलित नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालयाचा निकाल 94.20% इतका लागला असून विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवीत कु. सायली राजेश भाकरे हिने 96. 80 % गुण प्राप्त करीत केंद्रातून आणि संस्थेतून प्रथम येण्याचा आणि तालुक्यातून तिसरा येण्याचा बहूमान पटकावित सन्मा. संस्थेच्या आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला* *तिच्या पाठोपाठ संस्कृती प्रशांत बेहरे हिने 94 .40 % गुण मिळवित केंद्रातून दुसरी येण्याचा मान पटकाविला. पायल निलेश खुरसडे 91.80 % ' रोशनी प्रशांत बाखडे 86.60 % ' तनुश्री नरेंद्र इंगळे 85.20 % ' प्रियांशी कृष्णा सरोदे 80.60 % ' नयना प्रवीण वलीवकर 77.40% ' तन्वी मनोज खोपे 76.20% मिळवीत शाळेच्या यशाचा सोनेरी इतिहास समृद्ध केलात. त्यांनी अनुक्रमे उल्लेखनीय यश संपादित करीत ज्ञानसाधनेची उंच झेप घेतली. त्यांच्या उत्तुंग यशामागे संस्थेचे मा.अध्यक्ष डॉ. धनंजय तट्टे सर , उपाध्यक्ष मा. श्री. नित्यानंद देशमुख सर ' सचिव मा.प्रा.श्री.अरविंद तट्टे सर ' व्यवस्थापक मा.श्री. बाबुजी तट्टे सर ,सहसचिव ' मा.श्री. शिवाजी पाटील सर ' कोषाध्यक्ष मा.डॉ. श्री.आनंदजी तट्टे सर ' सदस्य मा.श्री.जय तट्टे सर 'मा . सौ. मालाताई तट्टे मॅम ' मा.डॉ.सौ. कांचन तट्टे मॅम ' मा.श्री.पी.आर. देशमुख सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि प्रेरणेने त्यांच्या यशाची एकंदरीत भक्कम पायाभरणी ठरली. शाळेतील अत्यंत मेहनती ' प्रामाणिक ' शिस्तप्रिय 'शिक्षक श्री. योगेंद्र तट्टे ' श्री.पी.बी. आडे ' श्री. निकेश चरोडे ' कु.तनुजा पोटे मॅम यांच्या समर्पित सेवेमुळे ' निःस्वार्थ आणि अविश्रांत मार्गदर्शन ' विश्वास यामुळे 'यांच्या परिश्रमाचं फलश्रुती म्हणजेच विद्यार्थ्यांचे यश. याकरिता सन्मा. पालकांचेही लक्ष्यवेधी सहकार्य ' पाठबळ लाभलेत* *विद्यार्थ्यांच्या अद्वितीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा देशमुख यांनी मार्गदशक संस्था ' निस्वार्थ शिक्षक ' आशा - अपेक्षांचे दीप विद्यार्थीनी ' पालकांचे भक्कम आभार आणि अभिनंदन केलेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या