Ticker

6/recent/ticker-posts

जुगनी सरपंच पोलीस ठाण्यात हजर हो,आरोपीत सरपंचाकडून तक्रारदाराचे अपहरण!

जुगनी येथील आरोपीत सरपंचाला अटक करा, आदिवासी संघटनांची पोलीस निरीक्षकांकडे  मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा : तक्रारदार श्री.टेंब-या शिवा वळवी राहणार जुगनी ता.धडगांव यांना आरोपीत श्री.राज्या थाव-या पवार सरपंच जुगनी राहणार जुगनी ता.धडगांव हे त्यांचेविरूद्धची तक्रार मागे घेणेसाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री.मगन चांद्या वळवी हे जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरणाचा प्रयत्न केला व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आरोपीत सरपंच जुगनी श्री.राज्या थाव-या पवार यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना व भारतीय स्वाभीमानी संघ अशा आदिवासी संघटनांकडून म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,अनिल पवार ,वसा वळवी,गुलाबसिंग वळवी सह तक्रारदार शिवा वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.आदिवासी संघटनांची तक्रार येताच पोलीस निरीक्षक म्हसावद यांनी आरोपीत जुगनी येथील सरपंच यांना पोलीस ठाण्यात हजर करण्याचे बीट हवालदार यांना निर्देश दिले.
                       २८ एप्रिल २०२५ रोजी विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा काढला होता.या मोर्चात का गेला? मोर्चात गेल्याचा व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा राग धरून धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच राज्या थाव-या पवार यांनी टेंब-या शिवा वळवी वय ६२   यांना वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी व काठीने मारहाण केली.मारहाण केल्याबद्दल जुगनी येथील सरपंच विरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ नुसार कलम ११५(२),३५१(२),३५२ अन्वये  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
               जुगनी येथील आरोपीत सरपंच राज्या थाव-या पवार व सदस्य श्री.मगन चांद्या वळवी हे तक्रारदार श्री.टेंब-या शिवा वळवी यांना  दिनांक १३/०५/२०२५,१४/०५/२०२५,१५/०५/२०२५ रोजी सलग ३ दिवस तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणत धमकी देत मोडलगांव, निगदी पर्यंत अपहरण करून आणले.तक्रारदारास आरोपीत व्यक्तीपासून वसा बारक्या वळवी,अमिताभ जोमा वळवी,गुलाबसिंग वांग-या पाडवी,रतिलाल जोमा वळवी,संतोष तुंबड्या वळवी इत्यादी गांवक-यांनी सोडवले व जुगनी येथील त्यांच्या राहत्या घरी पोहचवले.तरीही जुगनी येथील सरपंच हे वारंवार तक्रारदारास धमकी दमदाटी करून जबरदस्तीने  अपहरण करून जीवे ठार प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तक्रारदार टेंब-या शिवा वळवी यांच्या जीवितास धोका आहे.तक्रारदारास बरे वाईट काहीही झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार जुगनी येथील सरपंच राज्या थाव-या पवार सह शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघूवंशी यांना धरण्यात यावे व आरोपीत सरपंच यांच्यावर कायदेशीर पुन्हा कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी आदिवासी संघटनांनी पोलीस निरीक्षक यांचेकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या