लाभार्थी तुकडू कांबळे पाण्याच्या मजुरीच्या पैशापासून वंचित
पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष घरी भेट देऊन समस्या जाणून घेतली
आत्मदहन करण्याचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- दिनांक 14 जून 2025 ला सकाळी 11 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक, व जनता टाईम /जटा टीवी चे प्रतिनिधी पत्रकार संजीव भांबोरे यांनी यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी तुकडू किसन कांबळे राहणार पहेला यांना 2023 -24 या वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते.परंतु यांच्या घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु शासन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना आजपर्यंत पाण्याच्या मजुरीचे पैसे मिळालेले नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुकडू किसन कांबळे राहणार पहेला यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले असून घरकुल वर्क कोड डबल आल्यामुळे त्यांना पाण्याच्या मजुरीच्या पैशापासून वंचित रहावे लागत आहे. तुकडू किसन कांबळे यांचा जॉब कार्ड नंबर MH 28-0 26 -0 50 -001-/ 984 आहे. परंतु पंचायत स्तरावरून जॉब कार्ड नंबर चुकीने MH --28- 026-050-001-155 हा लिहिण्यात आलेला आहे . सदर जॉब कार्ड नंबर राकेश लोणारे राहणार पहेला यांचा असून त्यांना 2018 मध्ये घरकुल मंजूर झाले होते.त्यामुळे तुकडू कांबळे यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. सदर प्रकरणाला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.चुकी प्रशासनाच्या माणसाने करावी आणि भुर्दंड लाभार्थ्याला हे कितपत योग्य !त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून ज्यांनी कोणी ही चुकी केली असेल त्यांनी हे चुकी तात्काळ दुरुस्त करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे अशी मागणी लाभार्थी तुकडू किसन कांबळे यांनी सदर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राशी जमा न केल्यास पंचायत समिती समोर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असे सुद्धा ते म्हणाले. त्याबाबतची सदर तक्रार 12 मार्च 2025 ला लाभार्थ्याने खंडविकास अधिकारी पंचायत समिती भंडारा यांच्याकडे सुद्धा केली होती. परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही.
0 टिप्पण्या