Ticker

6/recent/ticker-posts

चौपदरीकरणासाठी नामदार विखेंना नारायणगव्हाणकरांचे साकडे,प्रांतअधिकारी काला म्हणून सक्षम नाहीत- सचिन शेळके / शरद पवळेनगर - पुणे महामार्गावरील सुरक्षेसह टोलनाका बंदच्या मागण्या


              
चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहमदनगर:-नारायणगव्हाणसह नगर पुणे महामार्गावरील प्रलंबित प्रश्नावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राळेगणसिद्धी दौऱ्यावर आले असता सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके यांनी सदर प्रश्नाचे गांभिर्याने लक्ष घालुन न्याय देण्यासंदर्भात निवेदन दिले.
         यावेळी शिरूर-नगर महामार्गावरील डिव्हाईडर कट केलेले बंद करणे, महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना दिशादर्शक फलक, सोलर दिवे, स्पीड ब्रेकर इत्यादी बाबी तातडीने लावण्यात येणे, महामार्गावर रिफ्लेक्टर सोलर दिवे बसवणे, टोल नाक्यावर मुलभूत सुविधा, सुलभ शौचालय इत्यादी गोष्ट्री पुरविणे, अपघातग्रस्तांना तातडीने सुविधा पुरविणे, वृक्षारोपनाबरोबर वृक्षांचे संगोपन करणे, महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग हटविणे नारायणगव्हाण भुसंपादनासाठी संयुक्त मोजणी तातडीने करून भूसंपादन करून योग्य मोबदला देवून चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे  यासंदर्भात प्रांताधिकारी चिंचकर यांना बोलावून त्याठीकाणी कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमत्र्यांनी ग्रामस्थांसमोर दिल्या.
         यावेळी  सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.


नारायणगव्हाण गावच्या अपूर्ण रस्त्यामुळे गावात मोठा धोका वाढला असुन ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने सातत्यपूर्ण निवेदन आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले असता प्रांताधिकाऱ्यांची काला म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषणा करण्यात आली परंतु कालाचा नाकर्तेपणा नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असुन नक्कीच पालकमंत्र्यांकडून न्याय मिळेल प्रशासनाने दिरंगाई केल्यास शेवटी न्यायालयात दाद मागणार- सचिन शेळके / शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या