चित्रा न्युज प्रतिनिधी
औरंगाबाद - वक्फ विधेयकाविरोधात वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी एकत्र येत या कायद्या विरोधात मोठी सभा आयोजित केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ता तय्यब जफर यांनी भूमिका मांडली.
१६ एप्रिल १९५४ चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की, धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप नको. त्याच निर्णयाला घेऊन आमची मागणी आहे की, सरकारने या वक्फ विधेयकाच्या ४४ दुरुस्ती मागे घेण्यात याव्या, अशी मागणी तय्यब जफर यांनी केली.
0 टिप्पण्या