Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी विभागाचे ३३५ कोटी रुपये लाडकी बहीण योजनेकडे वळवले!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी असलेला ३,३५ कोटी ७० लाख रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना लाडकी बहीण योजनेकरीता वळविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी राखीव असलेल्या निधीतून सामान्य फंडाची योजना चालविण्यासाठी दरमाह निधी वळता करून सरकारने अनुसूचित जाती जमाती यांच्या निधीवर दरोडे सुरू केली असून मंत्री मंडळातील अनुसूचित जाती, जमातीचे मंत्री आणि आमदार नुसत्या वल्गना करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या