Ticker

6/recent/ticker-posts

एकदा तळलेल्या तेलाची डब्बल फोडणीहंडरगुळी परिसरातील ग्राहकांचे आरोग्य धोक्यात;अन्न व औषधी खात्याचा 'विठूराया' गप्प का ?


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-आला पावसाळा तब्यत सांभाळा, असे आरोग्य खात्यातर्फे जनतेला सांगुन उघड्यावरील अन्न,पदार्थ न खाण्याचे आवाहन केले जाते.परंतू ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणा-या आणि स्व:ताचा गल्ला भरणा-या हाॅटेल,बेकरी व हातगाडेवाल्यांवर आजवर कारवाही करायची धमक प्रशासनाने दाखविले नसल्यामुळेच येथे उघड्यावर अन्न,पदार्थ बनवुन तसेच आज एकदा तळण्यासाठी वापरलेले गोडतेल दुस-या दिवशी ही वापरुन एकदा वापरलेल्या तेलाचा डब्बल वापर होत असल्याचे सर्रास दिसते.यामुळे हंडरगुळी परिसरातील ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरीही अन्न व औषध प्रशासन विभागाचा 'विठूराया' गप्पगार का ?  
उदगीर तालुक्यातील हाळीहंडरगुळी ही 2 गावे नांदेड-बिदर महामार्गावर आहेत.तसेच हंडरगुळीचा गुरांचा आठवडी बाजार सर्वदुर प्रसिध्द आहे म्हणुन राज्यासह परराज्यातील गोर, गरीब जनतेसह व्यापारी,खरेदीदार मोठ्याप्रमाणात येथे येतात.त्यातील अनेकजण हाॅटेल,बेकरी तसेच हात गाड्यावर बनवलेले खिचडी,भज्जे, पुरी-भाजी,इत्यादी अन्न खातात.पण हे अन्न बनवण्यासाठी अत्यावश्यक असते म्हणजे गोडतेल.आणि एकदा पदार्थ तळण्यासाठी वापरलेले आणि कढईत शिल्लक राहिलेले ते गोडतेल परत त्याच डब्ब्यात भरतात ! आणि दुस-या दिवशी खिचडी,पुरीभाजी, भज्जे,समोसे,कचोरी,शेव,चिवडा इ. अन्न,पदार्थ बनवण्यासाठी त्याच कढईत टाकतात.आणि गोडतेलाचा पदार्थ तळण्यासाठी व फोडणीसाठी  सर्रासपणे पुन्हा वापर केला जातोय. व अशा तेलापासून बनवलेले पदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी'खतरनाक' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उदगीर तालुक्यातील हाळीहंडरगुळी या 2 गावात महामार्गालगत 5 बेकरी  सह खिचडी,भजे,पुरी,भाजी,चहा ची विक्री करणारे 6 हाॅटेल आहेत.तसेच रविवार या दिवशी आठवडी बाजार असल्याने वाहतूकीस अडथळा होईल अशा 5 ठिकाणी हातगाडे लावुन त्यात शेव,पपडी,वडापाव, पाणीपुरी,भजे आदींची विक्री होते. यातील बहूतांश सगळेचजण तेलाचा डब्बल वापर करत असल्याचे दिसते तरीही ग्राहक माञ निपुटपणे तहान- भुक भागविण्यासाठी 'गपागप' असे हे अन्न खाताना दिसतात.पण अन्न व औषधी खात्याला दिसत कसे नाही? का,असे अन्न,पदार्थ खाऊन एखादा स्वर्गलोकी गेल्यावरच अन्न व औषध खात्याचा 'विठूराया' येथे येणार व कार्यवाही करणार का ?
—————————————— 
*65 चिकन व बिर्याणी सेंन्टर* मध्ये पण असा प्रकार घडत असल्याचे कळते. म्हणजे येथे असलेल्या 65 चिकन व बिर्याणी खानावळ/सेंन्टर्स मध्ये पण एकदा वापरुन कढईत शिल्लक राहिलेले तेल चिकन व बीफ तळण्यासाठी व फोडणीसाठी पुन्हा पुन्हा वापरतात. अशी चर्चा ग्राहकांमधून ऐकू येते.
*उघड्यावर तसेच विनापरमीट माॅंस विक्री बंद करा,असे पालकमंञ्याचे आदेश असूनही येथे सर्रासपणे उघड्यावर तसेच विनापरमीट माॅंस विक्री होते.ती पण सा.बां. खात्याच्या जागे मध्ये महा मार्गावर अतिक्रमण करुन माॅंस विक्री करतात.हे विशेष..!!*
विश्वास ठेऊन अन्न ग्रहन करायला येणा-या ग्राहकांचा दिवसाढवळ्या विश्वासघात करणा-यांवर कारवाई  होत नसल्यामुळे संबंधित अधिकारी व येथील विक्रेते यांच्यात "साटेलोटे'' तर नाही,ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या