चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने मागील दहा ते बारा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी त्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून त्यांना भरपाई देण्यात यावी यासाठी माढाच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांच्याकडे आज निवेदन देण्यात आले.
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे द्राक्ष डाळिंब पेरू केळी, उन्हाळी कांदा यासह इतर फळबागा व पालेभाज्यांचे नुकसान आतूनच झाले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे आणि पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे तरी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी माढा तालुका अध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश कुलकर्णी, माया माने, शंकर मुळूक, नंदकुमार मोरे, विवेक कुंभेजकर, संध्या कुंभेजकर, पांडुरंग राऊत, बिरुदेव शेळके, बालाजी माळी, प्रमोद रोटे, लाला झाडे, लेंडवे मेजर, सोमनाथ वाघमारे, नावजी अनबुले, अर्जुन माने, लखन पवार, अमोल देशमुख यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या