चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी स्थानिक स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते हुतात्मा स्मारक या मुख्य मार्गावर तिरंगा यात्रा काढण्यात आली. दरम्यान तिरंगा यात्रा शहरातून जाताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व हुतात्मा स्मारक परिसरात तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार करुन समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.
तिरंगा यात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तिरंगा घेऊन एनसीसीचे विद्यार्थी चालत होते. होमगार्ड कॅडर, माजी सैनिक संघटना सहभागी होत्या. महिलांनी सिन्दुरी रंगाची साडी परिधान करुन ऑपरेशन सिन्दुरची आठवण करुन दिली. देशप्रेम, भाईचारा व सामाजिक एकतेचा संदेश विद्यार्थ्यांनी विविध धर्माच्या वेशभूषा करुन दिला. यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’, 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'हिंदुस्थान जिंदाबाद',आदी घोषणा देण्यात आल्या.
तिरंगा यात्रेत वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सूरज शहा, ज्ञानेश्वर डुकरे, युवराज धानोरकर, विजय वानखेडे, ठाणेदार लता वाढिवे, यांच्या सह आजी-माजी सैनिकांमध्ये सिंदूर ऑपरेशन मधे सहभागी असलेले वीर सैनिक विशाल डाहुले, माजी सैनिक हेमके, नवरात्रे, अजित राम, विलास देठे, जयहिंद फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष मेजर विजय तेलरांधे, अरुण मत्ते, नागाडे, मांडवकर, भाऊराव मत्ते, गणेश नन्नावरे, आदी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शेवटी समारोपीय कार्यक्रमात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करुन व राष्ट्रगीताने शिस्तबद्ध तिरंगा यात्रेचा समारोप झाला.
या तिरंगा यात्रेला यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, पवन हुरकट, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे, विवेक सरपटवार सर, विनोद पांढरे सर, अमित गुंडावार, गोपाल गोसवाडे, राजेश भलमे, संजय रॉय, प्रशांत डाखरे, माधव बांगळे, विशाल ठेंगणे, लांजेवार सर, नितीन मशिदकर, शंकर पांडे, राजू बोरकर, गोविंदा बिंजवे, रितिक नामोजवार, नाना हजारे, मनोज बोरसरे, मोनू पारोधे, इम्रान शेख, सत्तार भाई, संदीप पाचभाई, सिकंदर शेख, बबलू शेख, पप्पू शेख, बालू ताठे, वंदना सिन्हा, अमृता सुर, लिमेश माणूसमारे, संजय वैद्य, सतीश कांबळे, दिलीप उमरे, प्रकाश पांपट्टीवार, सूरज चौधरी, प्रवीण महाजन, श्रीराम चौक कार्यकर्ते, आदींनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार प्रदर्शन मेजर विजय तेलरांधे यांनी केले.
0 टिप्पण्या