चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-बार्शी शहरातील भोसले चौक परिसरात मटका जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक इसम रंगेहाथ पकडला गेला आहे. नगर परिषद गाळ्याच्या आडोशाला सुरू असलेल्या या जुगारावर छापा टाकत पोलिसांनी संशयिताकडून रोख रक्कम आणि जुगार साहित्य हस्तगत केले आहे.
ही कारवाई दिनांक 29 मे 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अंकुश एकनाथ जाधव (पोकाँ/2111), सपोनि प्रदीप झालटे, पोहेकॉ दबडे (164), पोहेकॉ घाडगे (193), पोकाँ उदार (200), व पोकों पवार (787) यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
विशेष माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचासोबत जुगार सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी एका इसमाला पांढऱ्या कागदावर आकडेमोड करताना पाहून त्वरित अटक करण्यात आली. त्याचे नाव रविंद्र तानाजी दराडे (वय 31, रा. 2488, खुरपे बोळ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे आहे.
अटक केलेल्या इसमाकडून जप्त केलेली सामग्री:
₹340/- रोख रक्कम (विविध चलनी नोटा)
पांढरा कागद – त्यावर विविध प्रकारचे मटका आकडे लिहिलेले निळ्या शाईचा बॉलपेन
वरील सर्व साहित्य पोहेकॉ दबडे (164) यांनी पंचासमक्ष जप्त करून त्यावर पोलीस व पंचाचे सहिचे लेबल लावले.
या कारवाईनंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 चे कलम 12 (अ) नुसार एफआयआर क्र. 0485/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, स्थानिक पातळीवरील अशा अवैध जुगारधंद्यांवर पोलिसांची नजर असून कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या