Ticker

6/recent/ticker-posts

विवेकानंद महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत सुयश


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात स्थानिक कनिष्ठ विवेकानंद महाविद्यालयाचा निकाल लागला असून उत्कृष्ट निकाल लागला आहे.  विवेकानंद कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे लागला आहे. कला शाखेचा निकाल 58.33 निकाल लागला असून या शाखेत नयन राजीव धोटे, तनुश्री मनोहर मानकर, दीक्षा जगन्नाथ वानखेडे यांनी सुयश कमविले आहे. विज्ञान शाखेचा निकाल 95.91 टक्के लागला असून या शाखेत क्षितिज दिलीप राम, गौरव राजकुमार मत्ते, उज्वला नत्थू  बोधाणे यांनी सुयश कमविले आहे.  मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विषयात संघर्ष हरीश लांडगे, वैभव विकास आत्राम, साहिल रवींद्र कुटेमाटे यांच्यासह बँकिंगमध्ये आदित्य विकास खोब्रागडे, सानिया फिरोज शेख, निखिल संजय चव्हाण यांनी सुयश कमविले आहे. विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या