उत्तमराव जाधव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिका-याची मुजोरी, निवेदन घेण्यास नकार;आदिवासी संघटना आक्रमक
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :-ट्रॅव्हलवाले प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूटमार करीत असल्याबद्दल कारवाई करावी,अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी मागणीसंबंधीत संघटनांचे निवेदन येण्यास नकार दिला.त्यानंतर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी टपालात निवेदन देऊन अधिकाऱ्याविरोधात आक्रमक रूप धारण केले.आदिवासी संघटनांचे निवेदन घ्यायला व जनतेचे प्रश्न सोडवायला या अधिकाऱ्यांना लाज वाटत असेल तर या अधिकाऱ्याने आपली खुर्ची खुशाल सोडावी,पदावरून हटावे. यांना ट्रवल्स वाल्यांकडून हफ्ते मिळत असतील म्हणून या विषयाचे निवेदन घेत नाहीत. आमच्या दृष्टीने संघटनांचे निवेदन घेऊ न शकणारा हा अधिकारी नालायक आहे,बेजबाबदार आहे,या पदासाठी लायक नाही.या सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येईल व नंदुरबार जिल्ह्य़ातून हाकलपट्टी करण्याची मागणी करण्यात येईल,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा,नंदुरबार, नवापूर, तळोदा या तालुका ठिकाणाहून मुंबई, पुणे,सुरत इत्यादी विविध ठिकाणी जाणा-या ट्रॅव्हल बस मालकाकडून मनमानी पद्धतीने टिकीट रक्कम भाडे घेतले जाते.शहादा ते मुंबई एसटी बसचा भाडे टिकीट रक्कम ६०० रूपये असतांना ट्रॅव्हल वाले शहादा ते मुंबई पर्यंत १२००० ते १५०० पर्यंत अधिक रक्कम घेऊन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. ५ वर्षाखालील लहान बालकांचेही मनमानी पद्धतीने भाडे घेतले जाते.प्रवाशांच्या सोबत असणा-या कमी वजनाच्या सामानाचेही भाडे आकारले जाते. सण उत्सवाच्या वेळी तसेच शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या दिवशी प्रवाशांकडून तिप्पट भाडे घेतले जाते.ट्रॅव्हल निर्धारित वेळेवर सोडत नाहीत व पोहचवत नाहीत. ट्रॅव्हल कुठेही थांबवतात व टाईमपास करतात. एकंदरीत ट्रॅव्हल वाल्यांच्या मनमानीकाभाराने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो.सुखरूप प्रवास होत नाही.म्हणून ट्रॅव्हल, खासगी वाहनांना परिवहन विभागाने दिलेल्या नियमानुसारच मर्यादित भाडे टिकीट रक्कम आकारण्यात यावे व नियमानुसार ट्रॅव्हल बस चा प्रवास सुरू करण्यासाठी संबंधित जिल्ह्य़ातील सर्व ट्रॅव्हल एजन्सी,मालकांना सूचना देण्यात याव्यात.अशी मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या