Ticker

6/recent/ticker-posts

उसने घेतलेले पैसे दे,म्हणत जिवे मारण्याची धमकी.दोघांवर गुन्हा दाखल.

हंडरगुळीत घडली घटना..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-हात उसने घेतलेले पैसे द्या,असे म्हणत दोघांनी आईसह मुलालाही शिवीगाळ व मारहाण केली.व जिवे मारण्याची धमकी देत आरोपीनी फिर्यादीच्या डाव्या हातावर लोखंडी विळ्याने मारुन जखमी केल्याची घटना १८ मे रोजी १५.०० वाजता येथील आठवडी बाजारात घडली. या बाबत पोलीस सुञाकडून माहिती मिळाली की,हात उसने घेतलेले पैसे दे,असे म्हणत उमरगा यल्लादेवी ता. अहमदपुर येथील इसम देवानंद श्रीमंत कांबळे (३२ वर्षे,धंदा झाडू विक्री) याला आरोपी मधुकर कांबळे आकाश मधुकर कांबळे रा.चापोली या दोघांनी संगणमत करुन येथील आठवडी बाजारात मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.हाता- वर लोंखडी विळ्याने मारुन जखमी केले म्हणुन वरील आरोपींवर पो.स्टे. वाढवणा येथे हेकाॅ.०२ नागरगोजे यांनी गुरनं.१४८/२०२५ कलम ११८ (१),११५(२),३५२,३५१(२),३५१,३ ३(५)बीएनएस नुसार गुन्हा नोंदवला असून,याचा तपास पोहेकाॅ.संजय पी दळवे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या