शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा भरते पत्र्याच्या शेडमध्ये!
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :-शहादा तालुक्यातील वडगांव- चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे,शाळेची इमारत बांधकाम व्हावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्याची ७८ वर्ष पूर्ण होऊनही शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील जिल्हा परिषदची शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे.ही फार मोठी दूर्दैवाची बाब आहे.जिल्ह्य़ात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रूपये निधी होतो.तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागते,केवढी मोठी लाजीरवाणी परिस्थिती आहे.भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.शाळेत झेंडावंदन करण्यासाठी बांबूचा दांडा रोवण्यात आला आहे.आजू बाजूला कुणाच्या भिंती असून तेही झिरपले आहेत. त्यामुळे शेडमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आजूबाजूला बॅनर लावून शाळा बचावाचे कार्य सुरू आहे. ही जिल्हा परिषद ची शाळा आहे की बक-या बांधण्याचे शेड आहे? अशी शंका निर्माण होते.या शेडमध्ये वडगांव चिंचपाणी येथील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेत असतील, असा प्रश्न निर्माण होतो.अवकाळी पावसाने शेड पडू पडू झाले आहे.विद्यार्थांसाठी हे शेड धोकादायक आहे.तरी शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पक्की इमारत बांधकाम करून मिळावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या