Ticker

6/recent/ticker-posts

पाटबंधारे खात्याच्या विरोधात युवा सेनेच गणेशगांव बंधाऱ्यावर मुंडण करून निषेध आंदोलन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-माळशिरस तालुक्यातील निरा नदी वरील गणेशगांव येथील बंधारा गेली अनेक वर्ष झाले वाहून गेला होता तो बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त न केल्या मुळे   युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  मुंडण आंदोलन करण्यात आलं.
 गेली अनेक वर्ष  झाले निरा नदीवरील गणेशगांव येथील बंधारा पुराच्या पाण्या मुळे वाहून गेला होता .त्याच वेळी युवा सेनेच्या वतीने याच बंधाऱ्या वरती जल समाधी आंदोलन, जनांक्रोश आंदोलन ,हलगी नाद आंदोलन केली होती . त्यावेळी तो बंधारा तात्काळ दुरुस्त करून देतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु तो बंधारा आजतागायत दुरुस्त केला नाही .गणेशगांव हा बंधारा माळशिरस आणी इंदापूर तालुक्याला जोडलेला असून या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यापारी वर्गाचे दळण वळण जास्त प्रमाणात आहे .याही पेक्ष्या तेथील शाळकरी मुलांना गेली अनेक वर्ष झाले नाहक त्रास सहन करावा लागत आहे .दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे . हे लक्षात घेता.तेथील बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणी साठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व गणेशगांव मधील ग्रामस्थांच्या वतीने  गणेशगांव बंधाऱ्यावरती मुंडनं आंदोलन करून पाटबंधारे मंत्री व पाटबंधारे अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे महादेव लोखंडे विठ्ठल नलवडे, गणेश यादव,सिताराम शेंडगे ,माऊली मदने,नजीरभैय शेख , विजय यादव,बापु गोखले, माऊली क्षिरसागर,पोपट रुपनवर,नाना क्षिरसागर,भाईसाहेब शेख,अमीर कोरबु,लिंबाजी शिंदे, सुनील चव्हाण, मनोहर यादव, प्रशांत पराडे ,गणेश काळे ,लालासाहेब भोई ,ओम पराडे ,बन्सीलाल भोई, विकास भोई,संकेत इंगळे,अनिकेत पराडे  बापू भोई,अमित भोई,इ उपस्थित होते.



गणेशगांव येथील बंधाऱ्याचे काम जर आठ दिवसात नाही चालू झाले तर या पुढील आंदोलन हे पंढरपूर येथील पाटबंधारे कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल इशारा युवा सेनेच्या व शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.


गणेश इंगळे 
युवा सेना जिल्हा प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या