Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीतील बेकायदेशीर कुंटणखाना प्रकरणात लॉज मालक व मॅनेजरला जामीन मंजूर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी शहरातील दत्त बोळ परिसरातील उदय लॉजवर बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सोलापूर ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून सहा महिलांची सुटका केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉज मालक आनंद माने आणि व्यवस्थापक सुनिल माने यांना बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या छाप्याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सविता सुरेश कोकणे (पो.ह.कॉ.) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बार्शीमध्ये गस्तीदरम्यान पोलीस निरीक्षक रणजित माने यांना माहिती मिळाली होती की, उदय लॉजमध्ये महिलांना डांबून ठेवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला लावले जात आहे. त्यानुसार, बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकण्यात आला आणि कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात आला.

याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत ॲड. प्रशांत एडके, ॲड. समाधान सुरवसे व ॲड. आकाश मस्के यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने विरोध केला असतानाही, न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी आरोपींना जामीन मंजूर केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या