Ticker

6/recent/ticker-posts

मचानावरून वन्य प्राणी व रम्य निसर्गाचे अवलोकन एक अलौकिक निसर्गानुभव आहे — सईद शेख

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन विभाग भंडारा यांच्यावतीने वन्यजीवप्रेमींसाठी मचानावरून प्राणीगणना व निसर्ग, जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देण्यात आली. यामुळे वन्यजीव व पर्यावरणाबाबत जनजागृती घडवून आणण्यास मदत होते.

"बुद्ध पौर्णिमेच्या दूधासारख्या शुभ्र, शीतल चांदण्यात, निसर्गाच्या कुशीत, घनदाट जंगलं व डोंगर दर्यांमध्ये प्राणीगणना आणि निसर्गदृश्यांचं निरीक्षण करणे ही एक विलक्षण आणि अलौकिक अनुभूती आहे. त्याचबरोबर, निसर्ग व वन्यजीवांप्रती आपुलकी आणि संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजात जातो,"* असं मत कोका येथील सालेहेटी फुकटा तलावाच्या मचानावर प्राणीगणनेसाठी सहभागी झालेले ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मोहम्मद सईद शेख यांनी व्यक्त केले.

त्यांच्यासोबत भंडाऱ्याचे सहकारी श्री. अतुल वर्मा यांनी सांगितले की, *"खूप दिवसांनी पुन्हा मचानावरून निसर्गाचा आनंद अनुभवायला मिळाला."

तलावाच्या सान्निध्यात वन्यजीवांचे वास्तव्य आहे. तलावात पाण्याची कमतरता व आकाशात ढगांमुळे चंद्र स्पष्ट दिसत नव्हता, त्यामुळे वनराज किंवा इतर मोठे वन्यजीव दिसले नाहीत. पण या काळात निसर्ग, जंगल, तलाव परिसराची सौंदर्यपूर्णता आणि समृद्ध जैवविविधतेचा अनुभव नक्कीच मिळाला.

संध्याकाळपासून रात्रीपर्यंत ३ चितळ, १ जंगली गवा (बायसन), ५ जंगली डुकरं, माकड वगैरे वन्यजीव दिसले. संपूर्ण रात्रभर विविध प्रजातींच्या पशुपक्ष्यांचे आवाज, कलरव, तसेच रातकिडे, झिंगूर यांच्या आवाजांनी संपूर्ण जंगल परिसर गुंजून गेला होता.

या मचानावरील निसर्गअनुभव व प्राणीगणनेकरिता भंडाऱ्याचे प्रादेशिक वनक्षेत्र अधिकारी श्री. विलास बेलखोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्यासोबत क्षेत्र सहायक राजू तिबुडे, वनरक्षक छाया तेलमासरे, फायर वॉचर श्री. चंद्रशेखर उईके, वनमजूर राहुल कोडवते यांचेही सहकार्य लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या